जुन्या मुंबई-पुणे हमरस्त्यावरुन जाताना एक डोंगररांग आपलं लक्ष वेधून घेते. त्यातला एक आहे प्रबळगड. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेकडो किल्ल्यांपैकी एक असलेला हा किल्ला खूप मोठा आहे. फार कमी लोकांनी तो नीट पाहिला असेल. जाणून घेऊ या प्रबळगडाविषयी...
महाराष्ट्रात सध्या गिर्यारोहणाचं वेड वाढत चाललं आहे. आपल्या इथे केलं जाणारं गिर्यारोहण किंवा भटकंती ही सहसा एखाद्या गड-किल्ल्यावर किंवा घाटवाटेवर तर काही नुसत्या डोंगररांगावर केली जाते. यात प्रामुख्यानं समावेश आहे तो सह्याद्री पर्वतरांगांचा आणि येथील गड-किल्ल्यांचा. शेकडो वर्षांचा इतिहास लाभलेले हे गड-किल्ले आजही इतिहासाच्या पाऊलखुणा दाखवत आहेत. आज गडांवर जाणारे किती जण ऐतिहासिक गोष्टींचा अभ्यास करत असतील यात शंका असली, तरी किल्ल्यांवर जाण्याचं प्रमाण वाढतंय
गडकोटांच्या उदाहरणांमधील एक महत्त्वाचं उदाहरण म्हणजे पनवेलजवळचा, समुद्रसपाटीपासून २ हजार ३०० फूट उंचीवर असलेला ‘प्रबळगड’. याचं आधीचं नाव मुरंजन. जुन्या मुंबई-पुणे हमरस्त्यावरुन जाताना एक डोंगररांग आपलं लक्ष वेधून घेते. त्यातला एक गड म्हणजे प्रबळगड. पूर्वेला उल्हास नदी, पश्चिमेला गाढी नदी, दक्षिणेला पाताळगंगा नदी, माणिकगड आणि नैऋत्येला कर्नाळा किल्ला. जवळच आणि एक धार एकमेकांना जोडलेली असा इर्शाळगड असा चहूबाजूंनी वेढलेला हा किल्ले मुरंजन उर्फ प्रबळगड. प्रबळगड आणि त्याच्या बाजूचा कलावंतीणीचा सुळका याच्या मध्ये इंग्रजी ‘व्ही’ आकाराची खाच आहे. माथेरानच्या सनसेट पाँईंटवरून दिसणारा सूर्यास्त याच प्रबळगडाच्या आणि कलावंतीण यामध्ये होतो. प्रचंड मोठा पण, फार कमी लोकांनी नीट पाहिलेला असा हा किल्ला. कारण आज प्रबळगडावर प्रचंड संख्येनं लोक फिरायला किंवा गिर्यारोहणासाठी जात असतात. पण, ते प्रबळगडाला लागून असलेल्या कलावंतीण नावाच्या सुळक्यावर जातात ( पूर्ण सुळक्याला दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत) किंवा बैलशिंगाच्या वाटेनं प्रबळगडाच्या एका ठिकाणी जातात आणि ‘आम्ही प्रबळगड पाहिला’ असं म्हणतात. पण खरं तर प्रबळगडाचा आवाका हा प्रचंड मोठा. प्रबळगडावरील जंगलसुद्धा तेवढंच दाट, प्रबळगडावर असलेली समाधी, काळा बुरुज, गडावर बांधकामांचे ३ ते ४ अवशेष आहेत. पाण्याची टाकी आणि मानवनिर्मित चोकौनी आकारानं सुरुवात होऊन आतमध्ये मोठ्या खोल अशा गुहादेखील तिथे आहेत. काही लोकांच्या किंवा चांगल्या भटक्यांच्या नजरेत आलेल्या या गोष्टी आहेत. पण आजकाल तिथे जाणारे अनेक जण, एक तर कलावंतीण करून आम्ही प्रबळगड पाहिला, किंवा काळ्या बुरुजापर्यंत पूर्ण न जाताही नुसता भोज्जा करून, किल्ला पाहून आल्याचं सांगून मोकळे होतात.
गड-किल्ले हे असे न पाहता त्याचा प्रत्यक्षात त्या-त्या विशिष्ट ठिकाणी जाऊन ती जागा आणि त्या गोष्टी अनुभवायची गोष्ट आहे. इतिहास संशोधक त्याचा सखोल अभ्यास करतात. पण, खरीखुरी भटकी आणि गिर्यारोहक मंडळी काळाच्या आड जात चाललेल्या आपल्या गड-किल्ल्यांचे अनुभव नक्कीच घेऊ शकतात. या किल्ल्यांवर किती आणि काय दडलंय तो अनुभव आम्हाला, म्हणजे ‘निसर्ग मित्र’च्या टीमला २०१९ साली प्रस्तरारोहणाच्या मोहिमेदरम्यान ( Rock climbing expedition ) पाहणी करताना आला. कदाचित पहिल्यांदा आम्ही तिथे गेलो असू किंवा अनेक वर्ष तिथे कुणी गेलंच नसावं अशा काही जागाही आमच्या नजरेस पडल्या. त्या म्हणजे, प्रबळगडाच्या पश्चिमेस काही बुरुज, तटबंदी आहे. चक्क पूर्ण दगडात कोरलेला बुरुज आणि त्या बुरुजात एक अगदी सुंदर असा गुप्त दरवाजाही असलेला आमच्या नजरेस पडला. ही वैशिष्ट्यं अशी आहेत की पाहत राहावीत. प्रबळगड आणि असे अनेक गिरीदुर्ग हे नुसते जाऊन पूर्ण बघून होऊच शकत नाहीत. ते बारकाईनं पाहायला हवेत. किल्ल्यांवर गेल्यावर आपण निसर्गाचा पुरेपूर आदर करायला हवा. सुरक्षिततेची जाणीव ठेवून आणि गड-किल्ल्यांचं पावित्र्य राखून गड हा तसाच बघायचा प्रयत्न केला पाहिजे.
प्रबळगडावर पोहोचण्यासाठी आता खूप सोपं झालं आहे. पनवेलहून ठाकूरवाडी बस सेवा आहे. तसंच खासगी गाड्यासुद्धा जातात. तुम्ही तुमची गाडी घेऊन जाण्याचा पर्याय तर आहेच.
० ( शेडुंग मार्गे ) पनवेल - ठाकूरवाडीपर्यंत जाऊन तिथून चांगली पायवाट आहे, जी थेट माचीवर जाते.
० पनवेल - वाजे जाऊन तेथूनसुद्धा आता चांगली वाट झाली आहे.
० माथेरान जवळील शार्लोट जलाशयाजवळील पिसरनाथ मंदिराजवळून डावीकडे वळल्यावर दहा मिनिटांत आपण एका घळीत येऊन पोहोचतो. लोखंडी शिड्यांच्या सहाय्यानं दोन तासांत आरकस वाडी या गावात पोहोचता येतं. आरकस वाडीतून प्रबळगडचा डोंगर चढत काळ्या बुरूजाखाली असलेल्या पठारावरून घळीतून वर चढत जाता येतं. ( सोबत वाटाड्या किंवा माहितगार असावा)
० ठाकुरवाडीतून (प्रबळगडाचे पायथ्याचे गाव) प्रबळगडाकडे बघताना समोर पठार दिसतं. डाव्या हाताला कलावंतीण सुळक्याच्या खाली एक वाडी आहे आणि उजव्या हाताला एक वाडी आहे, ज्याला आम्ही तेथे राहणाऱ्या देहूची वाडी असं म्हणतो. तिथूनसुद्धा वर वाट जाते आणि नंतर ती वाट एका घळीतून थेट काळ्या बुरुजाकडे जाणाऱ्या वाटेवर पोहोचते. (सोबत वाटाड्या किंवा माहितगार असावा)
शहर
- Badlapur Crime : बदलापूर पुन्हा हादरलं; ६ वर्षीय चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे अश्लील चाळे
- SSC-HSC Result : यंदा दहावी-बारावीचा निकाल लवकर लागणार, शिक्षण मंत्र्यांनी थेट तारीखच सांगितली
- Pune : महात्मा गांधी रस्ता परिसरातून १५ लाखांचे मेफेड्रोन जप्त, दोघांना अटक
- Pune : राडारोडा टाकणाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यास अधिकाऱ्यांवर होणार शिस्तभंगाची कारवाई !
महाराष्ट्र
- Amravati Crime : काळं फासलं, मिरचीची धुरी अन् नग्न अवस्थेत धिंड, जादुटोण्याच्या संशयावरून ७७ वर्षीय महिलेसोबत अमानुष प्रकार
- Nagpur police guard : शेअर बाजारात फटका, पोलिसाने ड्युटीवर असताना स्वत:वर गोळी झाडली, नागपुरात खळबळ
- Chhatrapati Sambhaji Nagar : मड्याच्या टाळूवरचं लोणी खाणारे भुरटे, मृत महिलेच्या अंगावरील सोनं अन् पैसे गायब
- Beed News : बीडमध्ये चाललंय काय? महिला सरपंचाला मागितली एक लाख रुपयांची खंडणी
गुन्हा
- Pune : मद्यधुंद तरुणाकडून वाहतूक पोलिसाला मारहाण; मगरपट्टा परिसरातील घटना
- Madhya Pradesh Crime : श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती! विवाहित व्यक्तीकडून लिव्ह-इन पार्टनरची हत्या, ८ महिने मृतदेह फ्रिजमध्ये
- Pune Crime : पुण्यात धक्कादायक प्रकार उघड; शाळेतील मुलींचे चेंजिंग रूमध्ये कपडे बदलताना केले व्हिडिओ शूटिंग
- Mumbai : तरुणीचे केस कापले, नंतर बॅगेत भरून घेऊन गेला; दादर स्टेशनवरील धक्कादायक प्रकारानं खळबळ
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी
देश विदेश
- MahaKumbh : महाकुंभात साध्वी की मॉडेल? देखण्या साध्वीची देशभरात चर्चा, व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?
- MahaKumbh 2025 : महाकुंभातलं पहिलं अमृतस्नान; अडीच कोटी भाविकांची संगमावर डुबकी
- Mahakumbh Mela 2025 : संगमावर पहिल्याच दिवशी ४० लाख लोकांचा स्नान सोहळा, संगमात स्नानाचा उत्सव
- Maha Kumbh 2025 : महा कुंभमेळ्यासाठी रेल्वेचे खास नियोजन; रेल्वेसह यात्रेकरुंसाठी विशेष सुविधा