धक्कादायक.. पुण्यातील निसर्गोपचार केंद्रात उपचारासाठी आलेल्या दिल्लीतील महिलेवर पिस्तुलाच्या धाकाने बलात्कार

पुणे : निसर्गोपचार केंद्रात उपचारासाठी आलेल्या दिल्लीतील महिलेवर पिस्तुलाच्या धाकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी एकास अटक केली.

या प्रकरणी संजय बाजीराव भोसले (वय ५२, रा. उरुळी कांचन, पुणे-सोलापूर रस्ता) याला अटक करण्यात आली आहे. भोसले याच्या विरोधात बलात्कार, तसेच बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ३९ वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तक्रारदार पीडित महिला मूळची दिल्लीजवळील गाझियाबादची रहिवासी आहे. ती उरुळी कांचन परिसरातील निसर्गोपचार केंद्रात उपाचारासाठी आली होती. पीडित महिलेला मणक्याच्या विकार आहे. महिलेला निसर्गोपचार केंद्रात उपचार घ्यायचे असल्याने तिने परिसरात भाडेतत्वार खोली मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. तिची एका व्याक्तीमार्फत आरोपी संजय भोसले याच्याशी ओळख झाली. भोसलेने ५ जानेवारी रोजी महिलेला हडपसर भागात खोली दाखविण्याच्या बहाण्याने नेले. तेथील एका साेसायटीतील सदनिकेत भोसले महिलेला घेऊन गेला.

महिलेला पिस्तुलाचा धाक दाखवून त्याने बलात्कार केला. या घटनेची माहिती कोणाला दिल्यास जिवे मारू, अशी धमकी त्याने महिलेला दिली. घाबरलेल्या महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी त्वरित तपास सुरू केला. आरोपी भोसलेला अटक करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले तपास करत आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *