देशात कोरोना संसर्गात मोठी घट झाली आहे; गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 1247 नवे रुग्ण

देशात कोरोना संसर्गात मोठी घट झाली आहे. गेल्या २४ तासांत १२४७ नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. काल २१८३ नवीन कोरोना रुग्णांची नोंद आणि २१४ जणांचा मृत्यू झाला आहे. नवीन मृत्यूंसह देशात मृतांची संख्या ५ लाख २१ हजार ९६६ इतकी झाली आहे. सध्या देशात सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या ११ हजार ८६० इतकी झाली आहे.

सक्रिय रुग्णांची संख्या ११ हजार ८६० केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात सक्रिय रुग्णांची संख्या ११ हजार ८६० इतकी झाली आहे. रविवारी दिवसभरामध्ये देशात ९२८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनामुळे (corona) जीव गमावणाऱ्यांची संख्या ५ लाख २१ हजार ९६६ इतकी झाली आहे.
देशामध्ये आतापर्यंत ४ कोटी २५ लाख ११ हजार ७०१ रुग्ण कोरोना संसर्गमुक्त झाले आहेत. याबरोबरच देशात सध्याचा दैनंदिन कोरोना संसर्गाचा दर ०.०३ टक्के इतका आहे.

आतापर्यंत १८६ कोटीपेक्षा जास्त लसी देण्यात आल्या

देशव्यापी लसीकरणात आतापर्यंत १८६ कोटीपेक्षा जास्त कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. गुरुवारी दिवसभरात देशात १६ लाख ८९ हजार ९९५ कोरोना लसी देण्यात आल्या आहेत. भारतात आतापर्यंत १८६ कोटी ७२ लाख १५ हजार ८६५ कोरोनाच्या लसी देण्यात आल्या आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply