दिल्ली : मोठा अनर्थ टळला! टेकऑफच्या तयारीत असलेल्या विमानाखाली अचानक आली कार, पाहा

दिल्ली: दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा अनर्थ टळला आहे. टेकऑफच्या तयारीत असलेल्या एका विमानाखाली  अचानक कार आली. विमानाच्या पुढच्या चाकाजवळच्या भागात ही कार धडकली, ज्यामुळे ही कार तिथेच अडकली. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, ही कार अचानक रवनेजवळ कशी आली याचा तपास आता केला जाणार आहे. दुपारी एक वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या इंदिरा गांधी आतंरराष्ट्रीय विमानतळावर ही फ्लाईट इंडिगो एअरलाईन्सची होती, तर कार ही गो फर्स्ट गो या कंपनीची होती. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला आहे. ए ३२० निओ ही फ्लाईट दिल्लीहून पाटण्याला उड्डाण घेणार होती. प्लाईट रनवेवर जाण्यासाठी तयार होती. मात्र, रनवेवर जाण्याआधीच ही स्विफ्ट डिझायर कार विमानाला धडकली.

गो फर्स्ट गो एअरलाईन्सच्या ग्राऊंड स्टाफची एक कार थेट विमानतळावर उभ्या असलेल्या इंडिगो विमानाच्या पुढच्या चाकाखाली घुसली. क्रू मेंबर्स आणि पायलट यांना एअरपोर्टमधून बाहेर घेऊन जाण्यासाठी विमानतळावर असलेली कार टर्मिनल 2 वर उभ्या असलेल्या इंडिगो विमानाला धडकली. या घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी अचानक घडलेल्या या घटनेनं विमानतळावर एकच गोंधळ उडाला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply