दिल्ली : जहांगीरपुरी हिंसाचारामागे पाकिस्तानचा हात, भाजप आमदाराचा दावा

दिल्ली : जहांगीरपुरी येथे शनिवारी सायंकाळी हनुमान जयंती मिरवणुकीत दोन गटामध्ये हाणामारी झाली. तेव्हापासून पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित 25 जणांना अटक केली असून गृहमंत्रालयाला अंतरिम अहवाल सादर केला आहे. या हिंसाचारामागे गुन्हेगारी कट असल्याचं पोलिसांनी अहवालात म्हटलं आहे. तसेच या हिंसाचारामागे पाकिस्तानचा हात असल्याचा आरोप भाजप आमदाराने केला आहे.

हनुमान जयंतीच्या दिवशी परवानगी न घेता मिरवणूक काढण्यात आली. त्यामुळे आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातील काही सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर भाजपचे आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी एक दावा केला आहे. जहांगीरपुरी हिंसचारामागे पाकिस्तानच्या आएसआयचा हात असल्याचा आरोप गुर्जर यांनी केला आहे.

जहांगीरपुरी हिंसाचारप्रकरणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर विहिंपने हे आरोप फेटाळून लावले. विहिंप आणि आमच्या कार्यकर्त्यांना खोट्या प्रकरणात अडकविण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांची प्रतिमा मलिन होणार आहे, असं विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल म्हणाले. दरम्यान, पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) आणि काही मूलतत्ववादी देश यांचा हिंदूंचे जीवन विस्कळीत करण्याचा कट आहे, असे गंभीर आरोप आमदार गुर्जर यांनी केला आहे.

हनुमान जयंतीच्या दिवशी मिरवणुका काढण्यात आला. यावेळी दोन गटातील कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. वादाचे रुपांतर हिंसाचारात झाले. काचेच्या बाटल्या आणि दगडांचा मारा करण्यात आला. तसेच याठिकाणी गोळीबार देखील केला. यामध्ये एक पोलिस अधिकारी जखमी झाले आहेत. तसेच काही पोलिसांवर हल्ला करण्यात आला. तेव्हापासून या भागात जमावबंदी आणि संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply