तापलेल्या महासागरांमुळे राज्यात ‘मेघगर्जना’

पुणे : जागतिक तापमान वाढीचे संकट आता दिवसेंदिवस अधिकच गडद होत आहे. राज्यात दुपारनंतर तुरळक ठिकाणी जणू मॉन्सूनपूर्व वादळाची अनुभुती येत आहे. रविवारी (ता.२४) राज्यात दुपारनंतर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यताही हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

वाढलेल्या जागतिक तापमानामुळे जमीन प्रमाणापेक्षा जास्त तप्त होत आहे. पर्यायाने महासागरांतून जमिनीकडे येणाऱ्या ‘खाऱ्या वाऱ्यां’नी अधिक सोसाट्याचे रूप धारण केले आहे. महाराष्ट्रात तर पश्चिमेकडून अरबी समुद्र, पूर्वेकडून बंगालचा उपसागर आणि दक्षिणेकडील हिंदी महासागरातून येणाऱ्या वाऱ्यांचा संगम होत आहे. स्थानिक वाऱ्यांची दिशा, तापमानातील बदल आणि आद्रतेमुळे राज्यात तुरळक ठिकाणी दुपारनंतर मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात पाऊस हजेरी लावत आहे.

हवामान खात्याच्या वतीने स्थानिक हवामानाचा अंदाज घेऊन काही तास आधी वादळाची पूर्वसूचना देण्यात येत आहे. शनिवारी कोकण, गोवा आणि मध्यमहाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. कोकण गोव्यातील कमाल तापमानात लक्षणीय तर विदर्भ मध्य महाराष्ट्रात किंचितशी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान जळगाव येथे ४४ अंश सेल्सिअस असे नोंदविले गेले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply