डोंबिवली – झोपु योजनेत गाळे, सदनिका देतो सांगत ४८ जणांची फसवणूक; ३ कोटी ४७ लाखांचा घोटाळा

डोंबिवली - इंदिरानगर येथे बीएसयूपी योजनेंतर्गत सुरू असलेल्या बांधकामात स्वस्त दरात सदनिका, दुकानाचे गाळे मिळवून देतो असे सांगत तब्बल ४८ जणांची ३ कोटी ४७ लाखांना फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. सुरेश पवार असे फसवणूक केलेल्या भामट्याचे नाव आहे. त्याने नागरिकांकडून पैसे उकळलेच, शिवाय केडीएमसी व बीएसयूपी पुनर्वसन समितीचे बनावट प्रमाणपत्र, पालिकेचे अलॉटमेंट लेटर व इतर बनावट कागदपत्रे देऊन त्यांची फसवणूक केल्याचेही उघड झाले आहे. 

कल्याण पश्चिमेत बेतुरकर पाडा परिसरात राहणारे कांतिलाल भानुशाली यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार केली होती. त्यानंतर ही बाब उघडकीस आली. पवार याने कांतिलाल व त्यांचे वडील शंकरलाल यांना डोंबिवलीतील बीएसयूपी प्रकल्पात स्वस्त दरात दोन दुकाने खरेदी करून देतो असे सांगितले.

त्यासाठी त्यांनी सुरेशला १२ लाख रुपये दिले. २०१६ पासून ते आजपर्यंत दुकान दिले नाही, तसेच दिलेले पैसेही परत न केले नाही. सुरेश याने अशाच प्रकारे प्रलोभन दाखवत तब्बल ४८ जणांकडून तीन कोटी ४७ लाख उकळल्याचे तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस अधिक तपास करीत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply