ठाण्यात भीषण अपघात; नियंत्रण सुटलेल्या कारची १० ते १२ गाड्यांना धडक, रिक्षा चक्काचूर

image

ठाण्यातील घोडबंदर रोडवर गायमुख चौकीसमोर ताबा सुटलेल्या कारने १० ते १२ गाडीला धडक दिली. या अपघातामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली. काही तासांनंतर वाहतूक सुरळीत सुरू झालीय. धडक दिल्यानंतर गाडीचा चालक गाडी सोडून पसार झाला. त्याचा शोध सुरू आहे. या अपघातामध्ये रिक्षासहित इतर गाड्यांचंही मोठा प्रमाणात नुकसान झालेलं आहे. अपघातात जखमी झालेल्या रिक्षा चालकाला जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात असून त्याच्यावर पुढील उपचार सुरू आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *