ठाकरे बंधूंच्या युतीत मिठाचा खडा पडलाय? संजय राऊतांचा मोठा खुलासा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील राजकीय युतीमध्ये मतभेद असल्याच्या चर्चांना सध्या जोर चढला आहे. या संदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांना विचारले असता, त्यांनी नो कमेंट्स असे उत्तर दिले. विशेष म्हणजे, 14 फेब्रुवारी रोजी राऊत यांनी ठाकरे बंधूंची युती घट्ट असून त्यात कोणताही मिठाचा खडा पडणार नाही, असे ठामपणे सांगितले होते. त्यांच्या या बदललेल्या भूमिकेने राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

ठाकरे बंधूंच्या युतीत तणावाची काही प्रमुख कारणे समोर येत आहेत. यातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्वीकृत नगरसेवक पद. मनसेला शिवसेनेच्या कोट्यातून हे पद मिळावे अशी अपेक्षा होती. दुसरे कारण म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी वाढती जवळीक. कल्याण-डोंबिवली आणि नाशिक महापालिकेत मनसेने शिंदे गटाच्या शिवसेनेला सहकार्य केले आहे, तसेच राज ठाकरे यांनी नुकतीच एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. या घडामोडींमुळे ठाकरे बंधूंच्या युतीत आलबेल नसल्याची चर्चा अधिकच तीव्र झाली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *