टीम इंडियामध्ये स्थान मिळवण्यासाठी कायपण! दिनेश कार्तिकचं लक्ष्य वर्ल्डकप

IPL 2022 : ‘‘भारताच्या आंतरराष्ट्रीय संघात पुन्हा स्थान मिळविण्यासाठी मी माझे सर्वस्व पणाला लावले असून त्यासाठी आवश्यक असणारे सर्व काही प्रयत्न मी करत आहे,’’ अशी भावना अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकने शनिवारी व्यक्त केली आहे.

2004 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला प्रवास सुरू करणाऱ्या 36 वर्षीय कार्तिकने सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरसाठी काही उत्कृष्ट कामगिरी करताना विजय मिळवून दिलेले आहेत. बंगळूरने त्याला यंदाच्या मेगा लिलावात 5.5 कोटी रुपयांची बोली लावून खरेदी केले व कार्तिकनेही फ्रँचायजीने त्याच्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरवीत संघाला विजय मिळवून देण्यासाठी उत्तम कामगिरी केली आहे. त्याने दिल्ली विरुद्ध शनिवारी झालेल्या सामन्यात 34 चेंडूंत 66 धावांची दमदार खेळी करत बंगळूरला 16 धावांनी विजय मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला.

शनिवारी सामनावीर ठरलेला कार्तिक म्हणाला, ‘‘माझी ध्येय मोठी आहेत. मी खरोखर मेहनत केली आहे. देशासाठी काहीतरी खास करण्याचे माझे उद्दिष्ट आहे. हा माझ्या प्रवासाचा एक भाग आहे. भारतीय संघाचा भाग होण्यासाठी मी जे काही करता येईल ते करत आहे. लोक माझ्या शांत स्वभावाचे कौतुक करतात हे जाणून बरे वाटले. खरंतर शांतता ही आपल्या तयारीतून येते.’’ कार्तिकने मैदानात मोक्याच्यावेळी चौफेर फटकेबाजी करून संघाचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्सची जागा भरून काढली आहे. शनिवारच्या खेळीतही त्याने मारलेले काही फटके उत्तुंग आणि डिव्हिलियर्सची आठवण करून देणारे होते. कार्तिकच्या या खेळीने ऑस्ट्रेलियातील आगामीटी -20 विश्वकरंडकासाठी भारतीय संघात निवड होण्याची त्याची शक्यता वाढली आहे.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply