झारखंड : दिल्ली, राजस्थाननंतर झारखंड क्रूर घटनेने हादरलं; २२ वर्षीय तरुणीच्या शरीराचे आढळले १२ तुकडे

झारखंड : दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडासारखी आणखी एक क्रूर घटना झारखंडमध्ये घडली आहे. या क्रूर घटनेने झारखंडमध्ये खळबळ उडाली आहे. २२ वर्षीय तरुणीचे कटरने १२ तुकडे केल्याची घटना समोर आली आहे. रबिका पहाडीन असे मृत महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिलदार अन्सारी या संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रुबिका झारखंडमधील बोरियो पोलीस ठाणे क्षेत्रातील ही घटना आहे. रुबिका पती दिलदारसोबत बेलटोला येथे राहत होती. पती दिलदारने रुबिकाची क्रूर हत्या केल्याचा संशय पोलिसांचा आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, रुबिकाचे मृतदेहाचे तुकडे शनिवारी सायंकाळी ६ वाजता बोरिया पोलीस ठाण्यातील क्षेत्रात संथाली मोमिन टोला येथील जुन्या घरात क्रूर घटना उघडकीस आली. त्या घरात पोलिसांना रुबिकाचे १२ तुकडे आढळून आले. परंतु मृत रुबिकाचं धड आणि शरीराचा काही भाग पोलिसांच्या हाती लागले नाहीत.

मृत महिलेची ओळख पती दिलदार अन्सारीने केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, रुबिका पहाडीन ही दिलदारची दुसरी पत्नी होती. या प्रकरणी पोलिसांनी दिलदारला रात्री २ वाजेपर्यंत ताब्यात घेऊन कसून चौकशी केली आहे.

शनिवारी सांयकाळी ६ वाजता मोमिन टोला येथे नवनिर्मित अंगणवाडी केंद्राच्या मागे लोकांनी कुत्र्यांना मानवी मांस खाताना पाहिले, तेव्हा त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा आणखी उलगडा सुरू आहे. पोलिसांच्या महितीनुसार, मृतदेहाचे तुकडे हे इलेक्ट्रिक कटरने केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *