जळगाव : भुसावळ परिसरास भूकंपाचे हादरे, ३.३ रिश्टर स्केल तीव्रता

जळगाव : जिल्‍ह्यातील भुसावळ शहर परिसरात आज सकाळी भुकंपाचे सौम्‍य धक्‍के बसले. यामुळे नागरीकांमध्‍ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते जिल्‍हा प्रशासनाने दिलेल्‍या माहितीनुसार जळगाव जिल्‍ह्यातील भुसावळ व सावदा परिसरात सकाळी 10 वाजून 35 मिनिटांच्‍या सुमारास भुकंपाचे सौम्‍य धक्‍के जाणवले. रेक्‍टर स्‍केलवर ३.३ ऐवढी तिव्रता नोंदली गेली. शहरातील गडकरीनगर ग्रीन पार्क, विठ्ठलमंदिर वार्ड, शनि मंदिर वार्ड, वांजोळा रोड, बाजारपेठ परिसरातही दीड सेकंदाचे भुकंपाचे धक्‍के बसल्‍याचे नागरीकांनी सांगितले. शहरात या चर्चेला उधाण आले होते.

भुसावळ शहरातील श्रीरामनगर परिसरातील इमारतीतील नागरीक बाहेर पडत आले. तर राहुल नगरातील काही घरांमध्‍ये भांडे खाली पडल्‍याची माहिती समोर आली आहे. केशरनगरमध्‍ये देखील दरवाजे हलत असल्‍याने नागरीक घाबरले होते. यामुळे घाबरून नागरीक बराच वेळ घराच्‍या बाहेर थांबून होते. ज्‍या भागात भांडे पडले होते, तेथे नागरीक पहाण्यासाठी जमा झाले होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply