जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून केली सरपंचाची हत्या

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील बारामूला जिल्ह्यातील गोशबुग पट्टणमध्ये दहशतवाद्यांनी आज शुक्रवारी (ता.१५) एका सरपंचाची गोळ्या झाडून हत्या केली आहे. मंजूर अहमद बांगरु असे हत्या केलेल्या सरपंचाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बारामुला जिल्ह्यातील गोशबूग पट्टण भागात दहशतवाद्यांनीसरपंच मंजूर अहमदवर गोळ्या झाडल्या. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेले असता डाॅक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर नायब राज्यपाल प्रतिक्रिया दिली आहे. 

सरपंच मंजूर अहमद बांगरु यांच्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मी निषेध करत आहे. या निर्दयी घटनेत सहभागी दोषींवर कारवाई केली जाईल. या दुःखद प्रसंगी मी सरपंचांच्या कुटुंबीयांप्रती तीव्र सहवेदना व्यक्त करित असल्याचे जम्मू-काश्मीरचे (Jammu-Kashmir) नायब राज्यपाल सिन्हा यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply