छत्रपती संभाजीनगरमध्ये रात्रीतून उभारलेला औरंगजेब चौक पोलिसांनी हटवला, अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्ह्याचे नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्यात आल्याने राजकीय वातावरण तापत आहे. त्यातच चिकलठाणा येथील विमानतळ समोरील दुभाजकावर अज्ञात व्यक्तींनी आलमगीर औरंगजेब चौक नावाने चौक उभारला.

नव्या चौकाचा हा प्रकार समोर येताच मनसेने हा सर्व प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला. यानंतर पोलिसांनी तात्काळ याठिकाणी कलर‌ मारुन चौक हटवला आहे. याप्रकरणी शहरातील एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात एकाविरुद्व कलम 153 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकंदरीतच नामांतराविरोधात सुरू असलेल्या साखळी उपोषणात औरंगजेबाचा फोटो दिसल्यानंतर आता त्याच्या नावाने चौक निर्माण केल्याने आता आणखी एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply