गोव्यात समुद्र किनाऱ्यांवर दारू पिण्यास बंदी, नियमांचे उल्लंघन केल्यास ५० हजारांपर्यंत दंड

गोवा सरकारने राज्यातील पर्यटनाशी संबंधित काही नियम कठोर केले आहेत. गोव्यातील समुद्र किनाऱ्यांवर स्वच्छता राखण्यासाठी सरकारकडून काही नियम जारी करण्यात आले आहेत. या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना आर्थिक दंड ठोठावला जाणार आहे. त्यांच्यावर गोवा पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे.

नियमांचे उल्लंघन केल्यास ५० हजारांपर्यंत दंड

गोवा सरकारच्या नव्या नियमानुसार सार्वजनिक ठिकाणी जेवण बनवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. किनाऱ्यांवर कचरा फेकल्यास आर्थिक दंड ठोठावला जाणार आहे. या शिवाय किनाऱ्यावर गाडी चालवणं आणि दारू पिण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास पर्यटकांना पाच हजार ते ५० हजारांपर्यंतचा दंड ठोठावला जाऊ शकतो.

महाराष्ट्रातील मालवण आणि कर्नाटकातील कारवारमधील वॉटर स्पोर्ट्सच्या अवैध तिकीट विक्रीवरही गोवा सरकारने बंदी घातली आहे. अनधिकृतपणे तिकिट विक्री करण्याऱ्यांवरही सरकारकडून कारवाई केली जाणार आहे. अवैध व्यवसायांमुळे पर्यटन स्थळांचे नुकसान होत असल्याचे गोवा सरकारने म्हटले आहे. अनधिकृत हातगाड्या आणि फेरीवाल्यांवरही गोवा सरकारने निर्बंध लावले आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply