गुटख्यासंदर्भात ६५०० गुन्हे दाखल

औरंगाबाद : गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांवर बंदीसाठी फौजदारी जनहित याचिका दाखल झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. व्ही. के. जाधव आणि न्या. संदीपकुमार मोरे यांनी राज्य शासनाला अहवाल सादर करण्याचे आणि याचिकाकर्त्याला त्यातील मुद्दे देण्याचे निर्देश दिले. याचिकेवर २२ मार्च रोजी पुढील सुनावणी होईल. तसेच २०१२ पासून राज्यात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ उत्पादन, साठा, वाहतूक व विक्री प्रकरणात २०१२ पासून ते जानेवारी २०२१ पर्यंत केवळ ६,४९६ गुन्हे दाखल झाले आणि केवळ ३८६ खटलेच सुरु असल्याचे समोर आले आहे. राहुरी (जि. नगर) येथील सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब पवार यांनी औरंगाबाद खंडपीठात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांविरोधात कडक कारवाई करावी, त्यासाठी विशेष पथक असावे तसेच अन्न व औषध प्रशासनानेच ही कारवाई करावी, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. गुटख्यावर बंदी असतानाही त्याची विक्री होत आहे. अन्न व औषध प्रशासनाऐवजी अनेक ठिकाणी पोलिस गुटख्याचा साठा, वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई करतात. मात्र जप्त केलेला गुटखा पुन्हा काळाबाजारात विक्री होत असल्याचे याचिकेत म्हटले आहे.  


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply