गगनयान ( नवी दिल्ली ) : २०२३ मध्ये भारत झेप घेणार! मानवी अंतराळ मोहीमेसह राबवणार मानवी सागरी मोहीम

नवी दिल्ली: सर्व भारतीयांसाठी आनंदाची बातमी आहे. विज्ञान क्षेत्रात प्रगती करत असलेला आपला भारत देश आता आणखी एक मोठी झेप घेणार आहे. २०२३ मध्ये भारत आपली पहिली मानवी अंतराळ मोहीम  राबवणार आहे. सोबतच सागरी मोहीमही राबवणार आहे. भारत २०२३ मध्ये पहिली मानवी अंतराळ मोहीम 'गगनयान' (Gaganyaan) लॉन्च करणार आहे. तसेच खोल महासागरात संशोधन करण्यासाठी सागरी मोहीमही राबवणार आहे. २०२३ साली मानवी अंतराळ मोहीम आणि मानवी सागरी मोहीम एकाच वर्षी राबवत भारत विज्ञान क्षेत्रात एक मोठी झेप घेणार आहे. बुधवारी दिल्लीतील जागतिक महासागर दिनाच्या (World Oceans Day) एका समारंभाला संबोधित करताना अंतराळ आणि पृथ्वी विज्ञान मंत्री जितेंद्र सिंग यांनी ही माहिती दिली आहे.

दिल्लीतील जागतिक महासागर दिनाच्या समारंभाला संबोधित करताना जितेंद्र सिंग म्हणाले की, अंतराळ आणि महासागरात चालणाऱ्या दोन्ही मोहिमांच्या चाचण्या आता प्रगत टप्प्यावर पोहोचल्या आहेत आणि बहुधा २०२३ च्या उत्तरार्धात ही अनोखी कामगिरी साध्य होईल. सागरी मोहिमेतील उथळ पाण्यातील चाचणी २०२३ च्या सुरूवातीला होणार आहे. MATSYA 6000 याद्वारे ही चाचणी घेण्यात येणार आहे. तसेच खोल पाण्यातील सागरी मानवी माहिमेची चाचणी ही २०२४ मध्ये होण्याची शक्यता आहे." असं अंतराळ आणि पृथ्वी विज्ञान मंत्री जितेंद्र सिंग म्हणाले आहेत.

मिशन गगनयानसाठी क्रू एस्केप सिस्टम कार्यप्रदर्शनाच्या प्रमाणीकरणासाठी चाचणी वाहन उड्डाण यांसारख्या प्रमुख मोहिमा आणि गगनयानचे पहिले अनक्रूड मिशन २०२२ च्या उत्तरार्धात नियोजित केले आहे आणि त्यानंतर २०२२ च्या शेवटी दुसरे अनक्रूड मिशन असेल. इस्रोने विकसित केलेला "व्योमित्र" हा स्पेसफेअरिंग मानवी रोबोट आणि शेवटी २०२३ मधील पहिली क्रू गगनयान मोहीम घेऊन जाणार आहे. तसेच पुढे सिंग म्हणाले की, केंद्र सरकार लवकरच 'ब्लू इकॉनॉमिक पॉलिसी' चे अनावरण करेल आणि २०३० पर्यंत ४० लाख लोकांना महासागर आधारित उद्योगांमध्ये रोजगार मिळेल, असे मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.

केंद्र सरकारने गेल्या वर्षी जूनमध्ये खोल महासागर मिशनला मंजूरी दिली होती जी पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने पाच वर्षांसाठी ४,०७७ कोटी रुपयांच्या एकूण बजेटमध्ये राबवली होती. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना चांगले तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी आणि उद्योगांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. १००० ते ५५०० मीटर खोलीवर असलेल्या पॉलीमेटॅलिक मॅंगनीज नोड्यूल, गॅस हायड्रेट्स, हायड्रो-थर्मल सल्फाइड्स आणि कोबाल्ट क्रस्ट्स सारख्या संसाधनांचा खोल समुद्रात शोध घेण्यात येणार आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply