
नवी दिल्ली: सर्व भारतीयांसाठी आनंदाची बातमी आहे. विज्ञान क्षेत्रात प्रगती करत असलेला आपला भारत देश आता आणखी एक मोठी झेप घेणार आहे. २०२३ मध्ये भारत आपली पहिली मानवी अंतराळ मोहीम राबवणार आहे. सोबतच सागरी मोहीमही राबवणार आहे. भारत २०२३ मध्ये पहिली मानवी अंतराळ मोहीम 'गगनयान' (Gaganyaan) लॉन्च करणार आहे. तसेच खोल महासागरात संशोधन करण्यासाठी सागरी मोहीमही राबवणार आहे. २०२३ साली मानवी अंतराळ मोहीम आणि मानवी सागरी मोहीम एकाच वर्षी राबवत भारत विज्ञान क्षेत्रात एक मोठी झेप घेणार आहे. बुधवारी दिल्लीतील जागतिक महासागर दिनाच्या (World Oceans Day) एका समारंभाला संबोधित करताना अंतराळ आणि पृथ्वी विज्ञान मंत्री जितेंद्र सिंग यांनी ही माहिती दिली आहे.
दिल्लीतील जागतिक महासागर दिनाच्या समारंभाला संबोधित करताना जितेंद्र सिंग म्हणाले की, अंतराळ आणि महासागरात चालणाऱ्या दोन्ही मोहिमांच्या चाचण्या आता प्रगत टप्प्यावर पोहोचल्या आहेत आणि बहुधा २०२३ च्या उत्तरार्धात ही अनोखी कामगिरी साध्य होईल. सागरी मोहिमेतील उथळ पाण्यातील चाचणी २०२३ च्या सुरूवातीला होणार आहे. MATSYA 6000 याद्वारे ही चाचणी घेण्यात येणार आहे. तसेच खोल पाण्यातील सागरी मानवी माहिमेची चाचणी ही २०२४ मध्ये होण्याची शक्यता आहे." असं अंतराळ आणि पृथ्वी विज्ञान मंत्री जितेंद्र सिंग म्हणाले आहेत.
मिशन गगनयानसाठी क्रू एस्केप सिस्टम कार्यप्रदर्शनाच्या प्रमाणीकरणासाठी चाचणी वाहन उड्डाण यांसारख्या प्रमुख मोहिमा आणि गगनयानचे पहिले अनक्रूड मिशन २०२२ च्या उत्तरार्धात नियोजित केले आहे आणि त्यानंतर २०२२ च्या शेवटी दुसरे अनक्रूड मिशन असेल. इस्रोने विकसित केलेला "व्योमित्र" हा स्पेसफेअरिंग मानवी रोबोट आणि शेवटी २०२३ मधील पहिली क्रू गगनयान मोहीम घेऊन जाणार आहे. तसेच पुढे सिंग म्हणाले की, केंद्र सरकार लवकरच 'ब्लू इकॉनॉमिक पॉलिसी' चे अनावरण करेल आणि २०३० पर्यंत ४० लाख लोकांना महासागर आधारित उद्योगांमध्ये रोजगार मिळेल, असे मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.
केंद्र सरकारने गेल्या वर्षी जूनमध्ये खोल महासागर मिशनला मंजूरी दिली होती जी पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने पाच वर्षांसाठी ४,०७७ कोटी रुपयांच्या एकूण बजेटमध्ये राबवली होती. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना चांगले तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी आणि उद्योगांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. १००० ते ५५०० मीटर खोलीवर असलेल्या पॉलीमेटॅलिक मॅंगनीज नोड्यूल, गॅस हायड्रेट्स, हायड्रो-थर्मल सल्फाइड्स आणि कोबाल्ट क्रस्ट्स सारख्या संसाधनांचा खोल समुद्रात शोध घेण्यात येणार आहे.
शहर
- कर्नाटक मान्सून अपडेट: किनारपट्टी आणि अंतर्गत भागात मुसळधार पावसाची शक्यता; ११ जिल्ह्यांत 'यलो अलर्ट' जारी!
- मोठा दिलासा! अंतरवाली सराटीतील आश्वासनानुसार मृत आंदोलकांच्या वारसांना एमआयडीसीमध्ये नोकरीची घोषणा!
- संघ शताब्दी वर्षाची नवी रणनीती: संघटनात्मक बांधणी अधिक बळकट करणार, देशभरात वाढणार प्रचारकांची संख्या!
- सातारा जिल्ह्याचा धक्कादायक कारभार: चक्क 'अनफिट' रुग्णवाहिकांची धाव; जिल्हा परिषद सदस्याने उघड केले धक्कादायक वास्तव!
महाराष्ट्र
- कर्नाटक मान्सून अपडेट: किनारपट्टी आणि अंतर्गत भागात मुसळधार पावसाची शक्यता; ११ जिल्ह्यांत 'यलो अलर्ट' जारी!
- मोठा दिलासा! अंतरवाली सराटीतील आश्वासनानुसार मृत आंदोलकांच्या वारसांना एमआयडीसीमध्ये नोकरीची घोषणा!
- संघ शताब्दी वर्षाची नवी रणनीती: संघटनात्मक बांधणी अधिक बळकट करणार, देशभरात वाढणार प्रचारकांची संख्या!
- सातारा जिल्ह्याचा धक्कादायक कारभार: चक्क 'अनफिट' रुग्णवाहिकांची धाव; जिल्हा परिषद सदस्याने उघड केले धक्कादायक वास्तव!
गुन्हा
- कोकण रेल्वेची मोठी कारवाई: एक्स्प्रेसमध्ये सडकी फळे विकणाऱ्या विक्रेत्याला अटक; १५ दिवसांची विशेष मोहीम सुरू!
- अमरावती: तरुणीची निर्घृण हत्या; अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ!
- कोल्हापूर: प्रियकराकडून तीन मित्रांच्या मदतीने तरुणीवर अत्याचार; ब्लॅकमेलिंग प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल.
- दाऊदचा हस्तक 'सलीम डोळा'च्या ड्रग्ज नेटवर्कवर ईडीचा सर्जिकल स्ट्राईक; २० ठिकाणी छापेमारी, रोख रक्कम व महत्त्वाचे दस्तऐवज जप्त!
राजकीय
- पुणे विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी! शरद पवारांचे श्रीकांत पाटील तर अजित पवारांचे विक्रम काळे रिंगणात; चुरस वाढली!
- सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूक: ८ उमेदवारांची रिंगणात उडी! महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार शक्तीप्रदर्शन.
- सातारा मिनी मंत्रालयाचा 'भाई' कोण? सभापतींच्या दालनात तडीपार गुंडाची बर्थडे पार्टी; पोलिस यंत्रणेचे पितळ उघडे.
- अमरावतीत विधान परिषदेचा 'रंगीत' खेळ! प्रवीण पोटेंपासून हर्षजीत देशमुखांपर्यंत दिग्गज मैदानात; कोण मारणार बाजी?
इतर
- आजचे राशिभविष्य ३ जून २०२६: भद्र राजयोग व लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग, या राशींसाठी भाग्याचा दिवस!
- आजचे राशिभविष्य १ जून २०२६: जूनची सुरुवात या राशींसाठी ठरणार सुपरहिट, मिळतील मोठे लाभ आणि पदोन्नती!
- शहापुरात अन्नातून विषबाधा: एकाची प्रकृती चिंताजनक, २२ जण रुग्णालयात दाखल.
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- उसाचा रस विकून झाला सेलिब्रिटी; इन्स्टाग्रामवर १.२५ लाख फॉलोअर्स असलेला 'हा' विक्रेता चर्चेत!
- मुंबई: 'अशोक वडापाव'चा जागतिक गौरव! 'टेस्टॲटलस'च्या जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत पटकावले २५ वे स्थान.
- ट्रम्प यांच्या 'युद्धविरामा'च्या दाव्यांना हरताळ; लेबनॉनवर इस्रायलचे भीषण हल्ले सुरूच, ८ जणांचा मृत्यू.

























Subscribe to my channel



