“कोश्यारी नावाचं पार्सल महाराष्ट्रातून परत पाठवा,” राज्यपालांनी छत्रपतींबाबत केलेल्या विधानावरून मनसे आक्रमक

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान करून वाद ओढावून घेतला होता. शनिवारी कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांची तुलना नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्याशी केली आहे. त्यांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. कोश्यारी यांच्या विधानाचा विविध राजकीय पक्षांकडून निषेध व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही राज्यपाल कोश्यारींविरोधात आक्रमक झाली आहे. मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी ट्वीट करत राज्यपाल कोश्यारी यांची कानउघडणी केली आहे. कोश्यारी नावाचं पार्सल महाराष्ट्रातून परत पाठवा, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली.

गजानन काळे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, राज्यपालांनी सुधारायचं नाही, असं ठरवलेलं दिसतंय. ज्या विषयातलं कळतं नाही. तिथं ज्ञान का पाजळता? ज्यांना नितीन गडकरी किंवा शरद पवारांचा आदर्श घ्यायचा आहे, त्यांनी तो आदर्श घ्यावा. पण छत्रपती शिवाजी महाराज भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळात आदर्श होते व आदर्श राहतील. कोश्यारी नावाचं पार्सल या महाराष्ट्रातून परत पाठवा.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply