कोल्हापूर : विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यासाठी निघालेल्या शिवसैनिकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

कोल्हापूर : किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यासाठी शिवसैनिकांनी बुधवारी सकाळी छत्रपती शिवाजी चौकात एकत्र येत विशाळगड अतिक्रमणमुक्तचा नारा दिला होता. विशाळगडाकडे कूच करणाऱ्या या शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. विशाळगड अतिक्रमण मुक्त व्हावा यासाठी कोल्हापुरात लढा उभारला आहे.

गडावरील अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात केली आहे. अशातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत शिवसैनिकांनी विशाळगडकडे जाण्याचा निर्धार केला होता. हातात फावडे व कुदळ घेऊन शिवसैनिक विशाळगडकडे निघाले होते. यापूर्वीच शिवसैनिकांना पोलिसांनी राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळी रोखले. या ठिकाणी प्रचंड शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी केली.

किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यासाठी शिवसैनिकांनी बुधवारी सकाळी छत्रपती शिवाजी चौकात एकत्र येत विशाळगड अतिक्रमणमुक्तचा नारा दिला होता. विशाळगडाकडे कूच करणाऱ्या या शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. विशाळगड अतिक्रमण मुक्त व्हावा यासाठी कोल्हापुरात लढा उभारला आहे.

गडावरील अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात केली आहे. अशातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत शिवसैनिकांनी विशाळगडकडे जाण्याचा निर्धार केला होता. हातात फावडे व कुदळ घेऊन शिवसैनिक विशाळगडकडे निघाले होते. यापूर्वीच शिवसैनिकांना पोलिसांनी राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळी रोखले. या ठिकाणी प्रचंड शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी केली.

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *