दिल्ली : कोरोनाच्या बूस्टर डोसला उशीरा परवानगी, अदर पूनावाला यांनी व्यक्त केली खंत

दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची संख्या काही राज्यांमध्ये पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने राज्यांना दक्ष राहण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता १८ वर्षांवरील सर्वांसाठी बूस्टर डोस घेण्याची परवानगी केंद्राने दिली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (Serum Institute Of India) मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी देशातील कोरोना लसीकरण मोहिमेवर इंडिया इकाॅनाॅमिक काॅनक्लेव्हमध्ये आपल मत व्यक्त केले आहेत. पूनावाला म्हणाले,कोरोंना लसीचा बूस्टर डोस आवश्यक आहे. त्यामुळे लोक सुरक्षित राहतील. कोरोना आपले रुप बदलत आहे. तसेच त्याचे नवीन व्हेरिएंट्स येत आहेत.

केंद्र सरकारने कोरोना लसीच्या दोन डोसमधील अंतर कमी केल्याचे कौतुक करुन पुनावाला म्हणाले, आम्ही डिसेंबरपासून बूस्टर डोसला मंजूरी द्यावी या करिता विनंती करित होतो. मात्र त्यास उशीर झाला असून हे काम लवकर व्हायला हवे होते. सरकारवर टीका करित नाही. पण कोरोना महामारीच्या काळात नियामक संस्थांनी सक्रियता दाखवली, तसचं आताही करायला हवे, असा आशावाद अदर पूनावाला यांनी व्यक्त केला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply