कोंढव्यात राज ठाकरेंच्या भूमिके विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन

घोरपडी - गुढीपाडव्याच्या मनसेच्या मेळाव्यात मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले. त्यांच्या भूमिकेचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज दुपारी चार वाजता कोंढवा येथे निषेध आंदोलन घेण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी नगरसेवक हाजी गफूर पठाण, प्रदीप देशमुख, माजी नगरसेविका नंदा लोणकर, हाजी फिरोज शेख, रईस सुंडके, मोहसिन शेख, डॉ.शंतनु जगदाळे, समीर शेख, दिपक कामठे, अब्दुल हाफिज, मेहबूब शेख, हसीना इनामदार यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकाराप्रमाणे प्रत्येक धर्माला प्रत्येक जातीला आपल्या आपल्या रितीरिवाजानुसार सण-उत्सव,प्रार्थना व धार्मिक कार्य करण्याचे स्वातंत्र्य आहे. राज ठाकरे यांना पुढे करत समाजातील काही घटक हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण होईल व त्याचा राजकीय फायदा घेता येईल, असा विचार करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. यांचा तीव्र निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले होते. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply