केशवनगरमध्ये वारंवार ड्रेनेजच्या गळतीमुळे, रस्त्याची चाळण

मुंढवा - केशवनगर येथील रेणुकामाता मंदीर ते तुकाईमाता चौक रस्त्यादरम्यान रस्त्याच्या मधोमधच ड्रेनेज फुटले आहे. याला आता महिना उलटून गेला आहे, त्यामुळे रस्त्याची चाळण उडाली आहे. मात्र त्याकडे पालिकेचे लक्ष नाही. रस्त्याने जाणाऱ्या वाहनांना याचा त्रास होत असून परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. रात्री या ठिकाणी वाहने घसरून पडण्याच्या घटना घडत आहेत.

केशवनगर येथील रेणुकामाता मंदीर ते तुकाईमाता चौक या रस्त्यावर गेल्या कित्येक दिवसापासून केशवनगरमधील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात येत असल्याचे सांगितले जात असले तरी ते कमी होण्यापेक्षा वाढतच असल्याचे दिसून येते. छोट्या आकाराचे खड्डे हळूहळू मोठे होतात. ड्रेनेजच्या गळतीचे पाणी त्यात येऊन साठते. त्यामुळे नागरिकांना दुहेरी त्रास सहन करावा लागतो. खड्डे असलेल्या रस्त्यांवरून सतत प्रवास केल्याने पाठीचे विकार बळावत आहेत, वाहनांचे नुकसान होत आहे. याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. खड्डे दुरुस्त करताना ते पुन्हा तयार होणार नाहीत, याची काळजी घेण्याची गरज आहे.

या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. येथे ड्रेनेजची चार वेळा डागडुजी करूनही गळती थांबत नाही. खड्यांत घाण पाणी तुंबले आहे. रात्रीच्या वेळी पाण्यामुळे खड्ड्याची खोली कळत नाही व अपघात होतात. पण महापालिकेला गळती किंवा तुंबलेले ड्रेनेज महिनाभरात दुरुस्त करता आलेले नाही. हा आर्धा किलोमीटर रस्ता स्मार्ट सिटीचे मॉडेल आहे की काय, अशी शंका विकी माने यांनी व्यक्त केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply