
जगप्रसिद्ध केदारनाथ यात्रेच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच भाविकांच्या गर्दीने सर्व जुने विक्रम मोडीत काढत, नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. यंदा यात्रा काळात प्रथमच १२६ दिवसांत तब्बल ११ लाख भाविकांनी बाबा केदारनाथांचे दर्शन घेतले आहे.
२०१९ मध्ये सहा महिन्यांत १० लाख यात्रेकरू केदारनाथ धामला पोहोचले होते, मात्र यावेळी यात्रेने सर्व जुने विक्रम मोडले आहेत. अजून दीड महिन्याचा यात्रा कालावधी बाकी आहे. अशा परिस्थितीत केदारनाथला येणाऱ्या भाविकांचा आकडा १३ लाखांच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
१६ आणि १७ जून २०१३ रोजी केदारनाथ धाममध्ये घडलेली विनाशकारी आपत्ती क्वचितच विसरता येणार आहे. या भयंकर आपत्तीत केदारनाथमध्ये मोठा विध्वंस झाला होता. ज्यात हजारो लोक मारले गेले. ती भीषण परिस्थिती पाहून यात्रा पुन्हा रुळावर यायला बरीच वर्षे लागतील असे वाटत होते, मात्र पुनर्बांधणीच्या कामामुळे आपत्तीनंतर पुढच्याच वर्षी यात्रा सुरू झाली. तर, आपत्तीनंतर २०१९ मध्ये विक्रमी १० लाख भाविक केदारनाथला पोहोचले होते.
त्यानंतर २०२० आणि २०२१ मध्ये करोना महामारीमुळे यात्रा प्रभावित झाली होती. आता केदारनाथ धाम यात्रा २०२२ मध्ये रीतसर सुरू झाली आणि यात्रेने सर्व विक्रम मोडून एक इतिहास रचला आहे. पहिल्यांदाच ११ लाख भाविक अवघ्या १२६ दिवसांत केदारनाथला पोहोचले आहेत. अजून दीड महिन्याची यात्रा बाकी आहे. दररोज सात ते आठ हजार भाविक केदारनाथला पोहोचत आहेत. अशा स्थितीत केदारनाथ धामला येणाऱ्या भाविकांची संख्या १३ लाखांच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
केदारनाथ धामची यात्रा ६ मे रोजी सुरू झाली. सुरुवातीच्या टप्प्यात काही व्यवस्था विस्कळीत झाल्या होत्या, मात्र जिल्हा प्रशासनाने तातडीने व्यवस्था सुधारली. त्यानंतर प्रवाशांची संख्या वाढत गेली आणि प्रवासी येत राहिले. मोठ्या संख्येने येणाऱ्या प्रवाशांमुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध झाल्या आहेत.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले


























Subscribe to my channel
