कुणकेश्वरात सापडली अष्टप्रधान अमात्य नारोपंत नीलकंठ यांची समाधी; ऐतिहासिक उलगडा

image

अमित गवळे, रायगड

रायगड: छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील महत्त्वाचे पद भूषवणारे अमात्य नारोपंत नीलकंठ यांच्या देवगड तालुक्यातील कुणकेश्वर येथील समाधी वृंदावनाचा ऐतिहासिक उलगडा झाला आहे. या महत्त्वपूर्ण शोधावर आधारित शोधनिबंध 'कोकण इतिहास पत्रिका' (अंक १, जानेवारी-मार्च २०२६) मध्ये प्रसिद्ध झाला आहे. याचे प्रकाशन संत गोन्सालो गार्सिया कला व वाणिज्य महाविद्यालय, वसई येथे नुकतेच करण्यात आले. इतिहास संशोधक रणजित हिर्लेकर आणि सुधागड तालुक्यातील संदीप परब यांनी संयुक्तपणे हा सखोल अभ्यास पूर्ण केला आहे. कोकणच्या विशेषतः मराठा कालखंडातील इतिहासाच्या दृष्टीने हा शोध अत्यंत मोलाचा मानला जात आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *