मुंबई: किरीट सोमय्या मुलासह फरार झाले; संजय राऊत यांचा आरोप

मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या त्यांच्या मुलासह फरार झाले आहेत. न्याय यंत्रणेवर दबाव आणून सुटका करुन घेण्याच्या प्रयत्नात ते आहेत. न्यायालयाची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी बनावट कागदपत्रे तयार केली तरी सत्याचाच विजय होईल. प्रश्न इतकाच की, ते कुठे आहेत? मेहुल चोक्सी प्रमाणे पळून तर गेले नाहीत ?, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.

राजभवनने काही चुकीचे काम केले तर ते चुकीचे होईल त्यांनी तसे करु नये असा मी राजभवनला इशारा देत असल्याचे राऊत म्हणाले. आयएनएस विक्रांतसाठी पैसे गोळा करण्यात आले ते पैसे राजभवनला भरले नसल्याचे समोर आले आहे, या घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. विक्रांतचा पैसा त्यांनी पीएमसी बँकेत गुंतवले असल्याचा आरोप संजय राऊत यांनी यावेळी केला.

या संदर्भात न्यायालयात सत्याचा विजय होईल. आमचा न्यायालयावर विश्वास आहे, पण सोमय्या आणि त्यांचा मुलगा देश सोडून बाहेर जाऊ नये म्हणून लुकआउट नोटीस काढायाल हवी. कालपासून राजभवनात माफिया टोळीचे लोक जात आहे, राजभवनात जुन्या कागदपत्रांची जुळवा जुळव सुरु आहे. हे राजभवनाने करु नये असंही संजय  राऊत म्हणाले.

माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आयएनएस विक्रांतच्या नावाखाली पैसे गोळा करुन घोटाळा केला असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. आयएनएस विक्रांत जहाज वाचवण्याकरिता जमा केलेले पैसे राज्यपाल  कार्यालयामध्ये पोहचले नसल्याचे समोर आले आहे. माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागवण्यात आलेल्या माहितीतून ही माहिती समोर आली असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply