मुंबई : किरीट सोमय्यांचा मुंबई पोलिसांकडून शोध सुरु; ‘किरीट सोमय्या आऊट ऑफ कव्हरेज’

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर आयएनएस 'विक्रांत' साठी पैसे गोळा करुन ५८ कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी सोमय्या यांच्यावर मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मी असा कोणताच घोटाळा केला नसल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे. तर सोमय्या यांनी गोळा केलेले पैसे राज्यपाल भवनात जमा केले नसल्याचे समोर आले आहे. 

याप्रकरणी किरीट सोमय्या  आणि त्यांचे पुत्र नील यांना मुंबईतील ट्रॉम्बे पोलिसांनी आज हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. आयएनएस विक्रांत युद्धनौका गैरव्यवहार प्रकरणात गृहविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार किरीट सोमय्या हे अन ट्रेसबल असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

काल न्यायालयाने सोमय्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे सोमय्यांना अटक होण्याची शक्यता आहे. पण सोमय्या आऊट ऑफ कव्हरेज असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. मोबाईल, फोन क्रमांकावर फोन केल्यानंतर स्वीय्य सहाय्यकाच्या नंबरवर फोन डायव्हर्ट केला आहे, असंही पोलीस सूत्रांनी सांगितले.

किरीट सोमय्या राजभवनात बनावट कागदपत्रे तयार करुन बचावाचा प्रयत्न करीत आहेत. सोमय्या यांच्या देशविरोधी कृत्यापासून राजभवनाने दूर रहावे असा इशारा राऊत यांनी दिला आहे.

सोमय्या यांना वाचवण्यासाठी माफिया टोळीची राजभवनात ये-जा वाढली आहे. जुन्या तारखेची कागदपत्रे तयार करण्याचे काम सुरु आहे. राजभवनात बनावट कागदपत्रे तयार करुन सोमय्या यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण आमचा न्यायालयावर विश्वास आहे, असं राऊत म्हणाले.

सोमय्या आणि त्यांचा मुलगा फरार झाले आहेत. ते मेहुल चोक्सी जिथे लपला आहे तिथे तर गेले नाहीत याची भीती असल्याचे राऊत म्हणाले. आयएनएस विक्रांतचा घोटाळा मोठा आहे, गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे, असंही राऊत म्हणाले.

आयएनएस विक्रांतसाठी पैसे गोळा करण्यात आले ते पैसे राजभवनला भरले नसल्याचे समोर आले आहे, त्यामुळे हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. विक्रांतचा पैसा त्यांनी पीएमसी बँकेत गुंतवले असल्याचा आरोप राऊत यांनी यावेळी केला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply