कर्वेनगर भागात २० किलो गांजा जप्त; अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई; एकास अटक

पुणे : वारजे भागात गांजा विक्रीसाठी आलेल्या एकास गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. त्यांच्याकडून चार लाख रुपयांचा २० किलो गांजा जप्त करण्यात आला.

सागर विलास शिंदे (वय ३६, रा. मंगळवार पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी गुलटेकडी भागात राहणाऱ्या ७४ वर्षीय आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्वेनगरमधील गालिंदे पथ परिसरात शिंदे रिक्षातून गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गस्त घालणाऱ्या गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकास मिळाली. त्यानंतर सापळा लावून शिंदेला पकडण्यात आले. त्याच्याकडे असलेल्या पिशवीतून २० किलो २१५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत चार लाख चार हजार ३०० रुपये आहे. पोलिसांनी रिक्षा जप्त केली आहे. सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, मनोज साळुंखे, मारुती पारधी, संदीप जाधव, राहुल जोशी, विशाल दळवी आदींनी ही कारवाई केली.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply