कर्नाटकात भीषण अपघात; बस उलटल्यानं विद्यार्थ्यासह आठ जणांचा मृत्यू

कर्नाटकातील तुमकूर जिल्ह्यामधील पावागडाजवळ बस उलटून झालेल्या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला असून विद्यार्थ्यांसह 20 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी सांगितलं की, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं 60 प्रवाशांची बस उलटली, असं तपासात दिसून आलंय. 20 जखमींपैकी आठ जणांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं. वाय. एन. होसाकोटे ते पावगडा या खासगी बसमधून 30 हून अधिक जण प्रवास करत होते. यात कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं बोललं जातंय. ही बस प्रवाशांनी खचाखच भरलेली होती. यात अनेक प्रवासी बसले होते. पल्लवल्ली डायव्हर्शन येथील दुर्घटनंमुळं मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर बसचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. बसमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी असल्यानं हा अपघात झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. मृतांमध्ये बहुतांश महाविद्यालयीन विद्यार्थी असल्याचंही सांगण्यात येतंय. जखमींना पावागडा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गेल्याच आठवड्यात राज्यातील कलबुर्गी इथंही एक रस्ता अपघात झाला होता. त्यात बलुरागी गावाजवळ कार झाडावर आदळली होती. त्यादरम्यान 5 जणांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी या अपघातात प्राण गमावलेल्यांची ओळख पटल्याची माहिती दिली होती. यातील सर्व मृत महाराष्ट्रातील अहमदनगरमधील रहिवासी होते.


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply