औरंगाबाद : राज ठाकरेंच्या सभेला परवानगी दिली तर रस्त्यावर उतरू; ‘वंचित’बहुजन आघाडीकडून इशारा

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात होणाऱ्या राज ठाकरे यांच्या जाहीर सभेला परवानगी देऊ नका, राज ठाकरे यांच्या सभेमुळे शहरातली कायदा सुव्यवस्था बिघडेल, अशी भीती व्यक्त करत वंचित बहुजन आघाडीने राज ठाकरे यांच्या सभेला विरोध दर्शवला आहे. तसंच राज यांच्या सभेला परवानगी मिळाली तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा देखील वंचीत बहुजन आघाडीकडून देण्यात आला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यापासून पक्षबांधणीसाठी सभा घेण्याचा धडाका लावला आहे. शिवाजी पार्क नंतर ठाणे आणि येत्या १ मे रोजी ते औगंगाबादेत मोठी सभा घेणार आहेत. मात्र, त्यांच्या राज यांनी आपल्या भाषणामधून मशिदींवरील भोंग्याचा प्रश्न उपस्थित केला असून तो त्यांनी चांगलाच लावून धरला आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या भाषणांमुळे शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडत असल्याचे कारण देत वंचित बहुजन आघाडीने या सभेला परवानगी देवू नये अशी भूमिका घेतली आहे.

दरम्यान, एकीकडे मनसेच्या कार्यकर्त्यांकडून सभेची जय्यत तयारी सुरू असताना मराठवाडा सांस्कृतीक मंडळ बुक करण्यात आलं आहे. सभेला परवानगी मिळावी म्हणून पोलिस आयुक्तांकडे मनसेकडून आजच अर्ज देखील दाखल करण्यात आला असतानाच. आता दुसरीकडे या सभेला विरोध दर्शवत वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकाऱ्यांनी देखील पोलिस आयुक्तांची भेट घेऊन सभेला परवानगी नाकारण्याबाबत देण्यात आलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply