औरंगाबाद : राज्यपालांना महाराष्ट्राबाहेर पाठवा, शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्यानंतर संभाजीराजे छत्रपतींची संतप्त प्रतिक्रिया

औरंगाबाद : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. शिवाजी तर जुन्या काळातले आहेत, असं म्हणत त्यांनी नव्या वादाला तोंड फोडलं आहे. याबाबत माजी खासदार सांभाजीराजे छत्रपती यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपालांना महाराष्ट्राबाहेर काढा, असं त्यांनी म्हटलं आहे.

राज्यपाल भगत सिंग कोश्यारी सातत्याने अशी बडबड का करतात असा मला प्रश्न पडला आहे. मी म्हणतो यांना महाराष्ट्राच्या बाहेर काढा. माझी पंतप्रधान नरेंद्र मोदींना हात जोडून विनंती आहे की अशी व्यक्ती महाराष्ट्रात आम्हाला नको आहे, असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं. 

महाराष्ट्राचं वैभव असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांबद्दल असले घाणेरडे विचार घेऊन कुणी राज्यात येऊच कसं शकतं. यांना अजून राज्यपाल पदी ठेवता तरी कसं? असा संतप्त सवालही संभाजीराजे छत्रपती यांनी विचारला.

 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *