औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज सभा; काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष

औरंगाबाद - मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आज सायंकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेसाठी राज ठाकरे हे शनिवारी औरंगाबाद मध्ये दाखल झालेले आहेत. त्यांच्यासोबत अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे यांच्यासह मनसेचे प्रमुख नेते दाखल झाले आहेत. या सभेसाठी मनसेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात औरंगाबादेमध्ये दाखल होत आहेत. या सभेमुळे शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

या सभेची आठवडाभरापासून राज्यभर चर्चा सुरू आहे. पाडव्याच्या दिवशी झालेल्या सभेत मशिदीवरील भोंगे काढण्याविषयी राज ठाकरे यांनी राज्य शासनाला ३ मेचा अल्टीमेटम दिला आहे त्यावर आज पुन्हा राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. त्यासोबतच हिंदुत्वाची गर्जना करत शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरे ही आपली ताकद दाखवणार अशी चर्चा आहे. या सभेसाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी जय्यत तयारी केली आहे.

दुसरीकडे या सभेच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद हे संवेदनशील शहर असल्यामुळे पोलिसांनी मोठा बंदोबस्त शहरात लावलेला आहे. आता सभेत राज ठाकरे काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. या सभेनंतर राज ठाकरे हे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply