औरंगाबाद : बिबिका मकबराच्या जागेची होणार मार्किंग

औरंगाबाद : ऐतिहासिक बिबिका मकबराच्या परिसरातील अतिक्रमण काढण्यात आले. या जागेची मोजणी करून त्या जागा संरक्षित केल्या जात आहेत. यानुसार २० जूलैपासून मोजमाप करण्यात येत आहे. याला काही लोकांना विरोध केल्यामुळे पोलिस बंदोबस्तात ही मोजणी करण्यात आली. मोजणी झालेल्या या जागेची मार्किंग नंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय पुरात्व विभागातर्फे गुरवारी देण्यात आली.

भारतीय पुरातत्त्व विभागातर्फे नुकतेच मकबरा परिसरातील अतिक्रमण हटवण्यात आले. त्यानंतर ही जागा नियमाप्रमाणे मकबराच्या सातबाऱ्यात समाविष्ट करण्यात येणार आहे. नगरभूमापन कार्यालयातर्फे ही मोजणी करण्यात आली. यात राजकीय लोकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, मात्र सिटीसर्वे विभागातर्फे पोलिस बंदोबस्तातही मोजणी पूर्ण करण्यात आली. बिबिका मकबराच्या नावावर ८४ एकर जमीन आहेतय ही मोजणी पूर्ण होतात अतिक्रमण हटवण्याची कारवाई केली जाणार आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply