औरंगाबाद : फोडलेल्या दुभाजकांमुळे अपघातांना निमंत्रण

औरंगाबाद : शहरात जालना रोडवर आणि अन्य रस्त्यांवरील दुभाजक ठिकठिकाणी फोडून रस्ते तयार करण्यात येत असल्याचे अपघाताचे प्रमाण वाढत आहेत. गेल्या आठवड्यात जालना रस्त्यावर दोन वेळा अशा पद्धतीने अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे जालना रस्त्यांवर घुसखोरी करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. शहर वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी जालना रस्त्यांसह अनेक रस्त्यांवरील दुभाजक बंद केले आहेत. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली आहे. जालना रस्त्यावर आकाशवाणी, अमरप्रीत चौक, क्रांतीचौक अशा ठिकठिकाणी होणारी वाहतूक कोंडी दुर होण्यास मदत झाली आहे. पोलिसांनी आकाशवाणी चौक आणि अमरप्रीत चौकात बॅरीकेट लावून वाहतूक सरळ सुरु ठेवली त्यामुळे वाहनधारकांना सेव्हन हिल, मोंढानाका, क्रांतीचौक उड्डाण पुलांच्या खालून वळण घेऊन परत यावे लागत आहे. त्यामुळे रस्त्यांची लांबी वाढल्याने वाहनधारक उलट्या दिशेने रॉंगसाईड वाहने चालवत आहेत. दुसरीकडे चिकलठाणा, सेव्हनहिल येथे दोन ठिकाणी याशिवाय जिल्हा न्यायालय अदालत रोड येथे दुभाजक फोडण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनधारक अचानक रस्त्यात एका रस्त्यावरून बाजूच्या रस्त्यात घुसखोरी करत आहेत. सेव्हनहिल उड्डाण पुलाच्या खालीही दुभाजक फोडून दुचाकीस्वार अचानक रस्त्यावर येत असल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे. गेल्या आठवड्यात सेव्हनहिल उड्डाण पुलाजवळ अचानक दुचाकीस्वार रस्त्यात आल्याने कार चालकाने ब्रेक लावला, परिणामी तीन कार एकावर एक आदळल्या. तर दुसऱ्या अपघातात एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.  


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply