औरंगाबाद – ‘तेढ निर्माण करू नका’, औरंगाबादेतील राज ठाकरेंच्या सभेला विरोध

औरंगाबाद - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनी एक मेरोजी औरंगाबाद येथे सभा घेण्याचे ठरविले आहे. या सभेला परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ (इंडिया खरात) पक्षातर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदनाव्दारे केली आहे. राज ठाकरे हे सामाजिक वक्तव्याच्या नावाखाली धार्मिक वक्तव्य करत आहेत. त्यामुळे सामाजिक ऐक्य बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. सामाजिक तेढ निर्माण होऊ नये, मनसेच्या सभेला परवानगी देवू नये, अशा आशयाचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षातर्फे उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य यांना दिले. निवेदनावर जिल्हाध्यक्ष मनीष नरवडे, मनोज शेजवळ, आदित्य वाहुळ, योगेश उबाळे,संतोष सूर्यवंशी, नितेश तांगडे, करण ठोंबरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

राज ठाकरे यांच्यासह सर्वच जातीय, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या राजकीय नेत्यांच्या सभा, भाषणे यांना परवानगी देऊ नका अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाने पोलिस आयुक्तांना निवेदनाद्वारे केली. ॲड. प्रदिप त्रिभुवन, गजानन खंदारे, सतीश हिवराळे, रवि लिंगायत, मुन्ना मावस्कर, अफजल पठाण, संतोष सूरुळे, उत्तम वाघमोडे आदिंची उपस्थिती होती.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply