औरंगाबादेत तरुणाला बेदम मारहाण करुन खून, निर्दयी घटनेचा व्हिडिओ आला समोर

 

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये गुन्हेगारी कृत्य थांबताना दिसत नाही. त्यामुळे पोलिसांची वचक गुन्हेगारांवर राहिली नसल्याची चर्चा सुरु आहे. धक्कादायक घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात एका तरुणाचे हातपाय बांधून चार-पाच जणांनी बेदम मारहाण करत असल्याचे दिसत आहे. या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.औरंगाबादमधील टीव्ही सेंटर येथील शताब्दी नगरमध्ये किरकोळ कारणावरुन तरुणाचे हातपाय बांधून बेदम मारहाण करुन खून करण्यात आल्याची धक्कादायक घडली आहे. 

मनोज शेषराव आव्हाड असे मृताचे नाव आहे. मनोज हा शताब्दीनगर भागातील माजी नगरसेवकाच्या लाॅनमध्ये कामाला होता. लाॅनमधील लायटिंग चोरल्याच्या संशयावरुन चार-पाच जणांनी त्याचे हातपाय बांधून काठ्यांनी बेदम मारहाण केली. मनोज ओरडत होता. पण त्या नराधमांना त्याची दया आली नाही. या घटनेचा व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित करण्यात आला आणि तो मनोजच्या भावाला पाठवण्यात आला. गंभीर जखमी मनोजला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *