पुणे : पुणे महापालिकेच्या मंजुरी मिळालेल्या वैद्यकीय महाविद्यालयासह राज्याच्या वेगवेगळ्या भागातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाला (एमबीबीएस) प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने 13 पालकांची तब्बल अडीच कोटी रुपयांची फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. विमाननगर परिसरात संस्थेचे कार्यालय थाटून फसवणुकीचा प्रकार करण्यात आला. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात तिघांसह त्यांच्या साथीदारांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंद्रशेखर देशमुख, राजेंद्र कुशवाह, पारस शर्मा व त्यांच्या साथीदारांविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नगरमधील नेवासा येथील एका पालकाने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्यासह 12 जणांची या प्रकरणामध्ये फसवणुक झाली आहे. पोलिस उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या मुलाने वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक "नीट'ची परीक्षा दिली होती. त्यानुसार, आरोपींनी फिर्यादी व त्यांच्याप्रमाणे अन्य पालकांचे मोबाईल क्रमांक मिळवून त्यांच्याशी संपर्क साधला.
त्यांच्या मुलांना पुणे महापालिकेकडून लवकरच सुरु करण्यात येणाऱ्या "भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय', नाशिक येथील "एसएनडीटी' वैद्यकीय महाविद्यालयासह राज्याच्या वेगवेगळ्या भागातील वैद्यकीय महाविद्यालयात "एमबीबीएस'च्या अभ्यासक्रमाला महाविद्यालयाच्या व्यवस्थापन कोट्यातुन प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यानुसार, फिर्यादी यांच्याप्रमाणेच 12 पालकांशी चंद्रशेखर देशमुख यांनी संपर्क साधला.
फिर्यादीच्या मुलाला महापालिकेच्या अटलबिहारी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवुन देण्यासाठी 30 लाख 72 हजार रुपये त्यांच्या कार्यालयात बोलावून घेतली. त्याप्रमाणे अन्य पालकांकडूनही 20 लाखांपासून ते 30 लाख रुपयांपर्यंतची रक्कम घेतली. अशी 13 जणांकडून तब्बल दोन कोटी 53 लाख 17 हजार 559 रुपये त्यांनी घेतले. त्यानंतर त्यांनी फिर्यादीच्या मुलाला बनावट पत्रही दिले. त्यांनी संबंधित महाविद्यालयात जाऊन चौकशी केली, तेव्हा त्यांची फसवणूक झाल्याचे उघड झाले. त्यानुसार त्यांच्यासह अन्य पालक तेथे आले, त्यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
देशमुख, कुशवाह व शर्मा यांनी विमाननगर परिसरामध्ये शिक्षा सेवा इंडिया हि संस्था सुरु केली. याच संस्थेच्या कार्यालयामध्ये फिर्यादीसह अन्य पालकांना बोलावुन त्यांची फसवणूक केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पालकांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला, मात्र त्यांचे मोबाईल क्रमांक बंद होते. त्यामुळे पालकांनी कार्यालयाकडे धाव घेतली.तेव्हा, संबंधित कार्यालयालाही टाळे लागल्याचे दिसून आले. फिर्यादी यांच्याप्रमाणे सांगोला, पंढरपुर, पुणे, जळगाव येथील पालकांचीही फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे करीत आहेत.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले


























Subscribe to my channel
