ऊन्हाची तिव्रता जाणवू लागल्याने; गरीबांच्या फ्रीजला मागणी वाढली

मुंढवा : बाजारात उन्हाच्या तिव्रतेपासून शरीराला गारवा मिळण्यासाठी विविध कंपन्यांचे फ्रिज उपलब्ध असून त्यांच्या किंमती सर्वसामान्यांना परवडणाऱ्या नाहीत. त्यामुळे या उन्हात आपल्या कुटुंबाला गार पाणी तरी मिळावे याकरिता गरिबांचा फ्रिज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मातीच्या माठांना मागणी वाढली आहे. माठाच्या आकारानुसार शंभर रुपयांपासून ते दोनशे रुपयांपर्यंत तोटीसह माठ उपलब्ध आहेत. त्यांच्या खरेदीसाठी नागरिक माठाच्या दुकानाकडे वळलेले दिसतात. गरीबांचा फ्रीज म्हणजे माठ. उन्हाळा सुरु झाला की बाजारात लाल आणि काळ्या रंगाचे माठ दिसू लागतात. त्यातच उन्हाळ्यात माठांची मागणी देखील वाढते. परंतु, यंदा माठांच्या मागणी सोबतच त्याची किंमत देखील वाढली आहे. यावेळी कोळसा, भुसा, माती यांचे भाव वाढल्यामुळे परिणामी, माठाचे भाव देखील वाढले आहेत. त्यामुळे यंदा माठाच्या किंमतीत जवळपास २० ते २५ टक्क्यांची वाढ झाली आहे. मातीच्या माठातील पाणी हे नैसर्गिकरीत्या थंड होते. कृत्रिम फ्रिजच्या थंडगार पाण्याचा मानवी शरीरावर परिणाम होतो. मात्र ते लवकर व गार होत असल्याने अशा पाण्याचाच अधिक वापर होत असतो. असे असले फ्रीज खरेदी करण्याची ज्या कुटुंबांची ऐपत नाही त्यांना मात्र नैसर्गिक मातीपासून तयार करण्यात आलेल्या माठांचाच आधार घ्यावा लागतो. मुंढवा-केशवनगर परिसरात अशा प्रकारच्या माठांची विक्री करण्यात येत आहे. दिवसाकाठी आठ ते दहा माठांची विक्री होत असल्याची माहिती माठ विक्रेते मनोज कुमार यांनी दिली. तयार माठातून पूर्वी पाणी पिण्यासाठी त्यात पेला टाकून पाणी काढावे लागत होते. परंतु सध्या तोटी लावून माठाची विक्री केली जात असल्याने माठाचे पाणीही तोटीतून मिळत आहे. मोठ्या प्रमाणात काळ्या माठाला मागणी वाढली असून, नळ असलेल्या माठांची किंमत थोडी जास्त असल्याचे दिसून येत आहे. माठांच्या आकारानुसार शंभर ते २०० रुपयांपर्यंत माठ विकले जात आहेत. या माठांना उपनगरे तसेच काही प्रमाणात शहरातही मागणी असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply