उल्हासनगर येथे भिंतीवर डोकं आपटून प्रियकरानेच केला विधवा महिलेचा खून

उल्हासनगर : विधवा महिलेचे भिंतीवर डोके आपटून तिला ठार मारणाऱ्या प्रियकराच्या मुसक्या विठ्ठलवाडी पोलिसांनी इगतपुरी रेल्वे स्थानकातून आवळल्या आहेत. दुसऱ्या प्रवाशाच्या मोबाईलवरून फोन करणाऱ्या आरोपीचा लाईव्ह लोकेशनवरून पाठलाग करून त्याला गजाआड करण्याची कामगिरी पोलिसांनी बजावली आहे. सुकन्या या 44 वर्षांच्या महिलेच्या पतीचे निधन झाले होते. ती चिंचपाडा परिसरात मुलांसोबत राहत होती. सुकन्येचे 25 वर्षांच्या अनिल भातसोडेसोबत प्रेमसंबंध होते. ते लग्न करणार होते. अनिल हा बेरोजगार होता. तो सुकन्याकडून पैसे घेत होता. त्यामुळे अनिलचं घरी येणं जाणं वाढले होते.15 तारखेला अनिल आणि सुकन्या यांच्यात पैशावरून वाद निर्माण झाले आणि अनिलने सुकन्याला बेदम मारहाण करून तिचे डोके भिंतीवर आपटून गंभीर जखमी केले. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यापूर्वीच सुकन्याचा मृत्यू झाला. फरार झालेला आरोपी अनिलकडे मोबाईल नसल्याने तो विविध रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना माझा फोन चोरीला गेलाय, असे सांगून त्यांच्या फोवरून भावाला फोन करत होता. पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, सहायक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड यांच्या निर्देशानुसार व वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे डिटेक्शनच्या दोन टीम विविध स्थानकावर त्याचा शोध घेत होते. अशातच अनिलने एका प्रवाशाच्या फोनवरून त्याच्या भावाशी संपर्क साधला.अनिल हा ट्रेनमध्ये असल्याचे लाईव्ह लोकेशन मिळताच उपनिरीक्षक हर्षल राजपूत, हवालदार रामदास मिसाळ, सानप, समीर गायकवाड यांनी कारमधून इगतपुरी गाठून अनिलच्या मुसक्या आवळल्या.  


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply