इंदापूर : प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था निवडणूक; पहिल्याच दिवशी ६ अर्ज

इंदापूर : इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सन २०२१/२२ ते २०२५/२६ या पंचवार्षिक निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशीसहा नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले असल्याची माहिती निवडणूकनिर्णयअधिकारी तथा इंदापूर तालुका सहाय्यक निबंधक जिजाबा गावडे यांनी दिली. इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची स्थापना १९२५ साली शंकर हरी जावडेकर यांनी केली असून गेली १६ वर्षे या संस्थेवर शिक्षक समितीचे वर्चस्व आहे. या संस्थेची उलाढाल १३७ कोटी रुपयांच्या घरात असून तालुका विकासात संस्थेचे महत्वपूर्ण योगदानआहे. निवडणुकीत ९५१मतदार आपला हक्कबजावणारआहेत. शिक्षक समितीची सत्ता उलथवून टाकण्या साठी स्वाभिमानी शिक्षक पॅनेलने आपली संपूर्ण ताकद लावली आहे. सन २००७ ला ही संस्था बिनविरोध झाली मात्रत्यानंतर २०१५ साली शिक्षकसमितीविरूद्धस्वाभिमानी शिक्षक पॅनेल अशी लढत झाली. लढतीत शिक्षक विकास पॅनेलने निर्विवादसत्तास्थापन केली. संस्थेवर माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व मोडूनकाढण्या साठी सामान्य प्रशासन राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांना मानणाऱ्या शिक्षकांनीसाम,दाम ,दंड,भेद निती अवलंबली आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार असली तरी शिक्षक समितीस विजयाची खात्री आहे.या निवडणुकीसाठी संगिता पांढरे,विद्यमान सभापती वसंत फलफले,माजी सभापती सुनिल वाघ,सुनिल शिंदे, संतोष गदादे यांनी अर्ज दाखल केले आहेत. या निवडणूकीसाठी दि.२१ मार्च ते २५ मार्च पर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था इंदापूर कार्यालयात नामनिर्देश दाखल करतायेईल.दाखलअर्जाची छाननी दि.२८ मार्च रोजी पार पडेल.दि. २९ मार्च ते दि.१२ एप्रिल दुपारी ३ पर्यंत अर्ज मागे घेता येतील. दि.१३ एप्रिलरोजी उमेदवारांना चिन्हवाटप तर दि.२४ एप्रिल रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ यावेळेत प्रत्यक्ष मतदान होईल. त्याचदिवशी मतदान प्रक्रिया संपल्यानंतर अर्ध्या तासानेमतमोजणी होऊन निकाल जाहिर केला जाणार आहे. इंदापूर पगारविभाग सर्वसाधारण-३,भिगवण -लोणी देवकर पगार विभाग -४,सणसर-निमसाखर पगार विभाग सर्वसाधारण -३, लासुर्णे-निमगांव पगार विभागसर्वसाधारण- ३, बावडा-रेडणी पगार विभाग सर्वसाधारण - ३, महिला सदस्य - २, अनु.जाती/जमाती -१, इतर मागासवर्गीय - १, भ. ज./वि./जमाती/विशेष मागास प्रवर्ग -१ असे एकूण २१ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

1 thought on “इंदापूर : प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था निवडणूक; पहिल्याच दिवशी ६ अर्ज

Leave a Reply