अहमदनगर : दोन तरुणांच्या किरकोळ वादातून तरुणाचा खून; संगमनेर तालुक्यातील खुर्दच्या सुपेकरवस्ती येथे ही घटना घडली.

संगमनेर : दोन तरुणांच्या किरकोळ वादाचे पर्यावसन खुनात झाले. संगमनेर तालुक्यातील खुर्दच्या सुपेकरवस्ती येथेही घटना घडली. प्रकाश दुर्योधन गोफणे (वय ३२) मृताचे नाव आहे. या प्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी सूरज सोमनाथ जेडगुले याला ताब्यात घेतले आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आरोपी सूरज सोमनाथ जेडगुले शनिवारी दारू पिऊन आला. यावेळी त्याचे प्रकाश दुर्योधन गोफणे याच्याशी भांडण झाले. यावेळी गोफणे याने लाकडी दांडा जेडगुले याच्या तोंडावर मारला. त्याचा राग आल्याने जेडगुल याने रागातून हत्याराने गोफणे याचा खून केला. रविवारी सकाळी सातच्या सुमारास जखमी प्रकाश गोफणे याला त्याच्या नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केले. मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याबाबत त्याचा भाऊ शंकर गोफणे याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी सूरज जेडगुले याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *