अहमदनगर : कुक्कुटपालनात ५४ लाखांची फसवणूक

अहमदनगर: अलिबाग (जि. रायगड) येथील एका कंपनीच्या ५४ लाखांच्या फसवणूकप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली. महेश बबन भोर (वय ३५, रा. निमगाव वाघा, ता. नगर) असे या आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली.

नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक युवराज चव्हाण, पोलिस अंमलदार योगेश ठाणगे, विक्रांत भालसिंग, राजू खेडकर यांच्या पथकाने आरोपी भोर याला इस्लामपूर (जि. सांगली) येथून अटक केली. शेतकऱ्यांनी कुक्कुटपालनसाठी कंपनीकडून आणलेल्या सुमारे साडेसोळा हजार पिलांची, कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी संगनमत करून परस्पर विक्री केली.
करारनाम्याच्या मूळ प्रतींची चोरी केल्याच्या या प्रकरणात, अलिबाग येथील प्रिमियम चीक फिड्‌स कंपनीची ५४ लाखांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात पोल्ट्रीचालक व कंपनीतील कर्मचारी अशा १० जणांविरोधात फसवणूक व चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.


विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *