अमरावतीत ST बसला उड्डाणपुलावर भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस बराच वेळ हवेतच लटकली

अमरावतीमधून मोठं वृत्त समोर आलं आहे. अमरावती-नागपूर महामार्गावर नांदगाव पेठ येथे एसटी महामंडळाच्या बसला अपघात झाला आहे. नांदगाव पेठच्या उड्डाणपुलावरून बस खाली कोसळताना थोडक्यात बचावली आहे. त्यामुळे अपघातातून या बसमध्ये प्रवासी करणाऱ्या अनेक प्रवाशांचे जीव थोडक्यात बचावले आहेत. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

राज्यातील विविध महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. अमरावती-नागपूर महामार्गावरील एसटी बसच्या अपघाताचं वृत्त समोर आलं आहे. अमरावती-नागपूर महामार्गावरून नांदगाव पेठ येथून एसटी बस नागपूरला जात होती. त्यावेळी अमरावती-नागपूर महामार्गावरील कठड्याला एसटी बस जोराने धडकली.

त्यावेळी एसटी बसमध्ये प्रवाशी बसले होते. बस धडकल्यानंतर प्रवाशांमध्ये एकच भीती पसरली. एसटी बस कठड्याला धडकल्यानंतर उड्डाणपुलावर बराच वेळ हवेतच लटकली. त्यावेळी बसमध्ये बसलेल्या प्रवाशांचा श्वास अडकला.

नशीब बलवत्तर म्हणून बसमधील प्रवासी नांदगाव पेठच्या उड्डाणपुलावरून बस खाली कोसळताना थोडक्यात बचावले आहेत. मात्र, बसमधील काही प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातात अनेक प्रवाशांचे जीव थोडक्यात वाचले आहेत. औरंगाबादवरून नागपूरला ही एसटी बस होती. नागपूरमधील गणेश पेठ डेपोच्या या बसला अपघात झाला आहे.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply