अफगाणिस्तानच्या मशिदीत मोठा स्फोट; स्फोटात 20 हून अधिक जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : अफगाणिस्तानमधून एक मोठी बातमी समोर आलीय. उत्तर अफगाणिस्तानमधील मजार-ए-शरीफ शहरातील एका मशिदीत मोठा स्फोट झालाय. या स्फोटात अनेकांचा बळी जाण्याची शक्यता आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं गुरुवारी स्थानिक तालिबान कमांडरच्या हवाल्यानं ही माहिती दिलीय. मिळालेल्या माहितीनुसार, या स्फोटात अनेकांचा मृत्यू झाला असून 50 हून अधिक लोक जखमी झाल्याची भीती आहे.

मजार-ए-शरीफच्या तालिबान कमांडरचे प्रवक्ते आसिफ वजेरी यांनी सांगितलं की, 'तुरुंगातील शिया मशिदीत हा बॉम्बस्फोट झालाय. या स्फोटात 20 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून मोठ्या संख्येनं लोक जखमी झालेत.' मिळालेल्या माहितीनुसार, मजार-ए-शरीफशिवाय काबूल, नांगरहार आणि कुंदुजमध्येही स्फोट झालेत. मजार-ए-शरीफ येथील मशिदीमध्ये एकूण 4 स्फोट झाल्याचं सांगण्यात येतंय. स्फोटात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

या स्फोटापूर्वी काबूलमध्ये रस्त्याच्या कडेला झालेल्या स्फोटात दोन मुलं जखमी झाल्याचं वृत्त आहे. काबूलमध्ये आज ज्या ठिकाणी स्फोट झाला, त्याच भागात दोन दिवसांपूर्वी 19 एप्रिल रोजी बॉम्बस्फोट झाला होता. एका शाळेत हा स्फोट झाला आहे. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply