पुणे : अखेर नवले पुल परिसरातील अतिक्रमणांवर महापालिकेकडून कारवाईचा बडगा

पुणे : नवले पुलाजवळ रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने अखेर या परिसरातील अतिक्रमणावर कारवाईचा बडगा उगारला. मंगळवारी सकाळीच 100 पोलिसांच्या बंदोबस्तात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करण्यास सुरुवात केली.

कात्रज नवीन बोगदा ते नवले पुल या परिसरात रविवारी रात्री झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात 10 जण गंभीर जखमी झाले, तर एका तरुणाचा मृत्यू झाला. याबरोबरच सुमारे 32 वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेची राज्य सरकारने गांभीर्याने दखल घेत तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते.

त्यानुसार, पोलिस, महापालिका, रस्ते विकास महामंडळ यांच्या पथकाने सोमवारी घटना स्थळाची पाहणी करून तत्काळ करण्याच्या उपाययोजना सुचविल्या होत्या. तसेच सातत्याने होणाऱ्या अपघाताबाबत विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना खडसावले होते.


विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *