अकोला : 'विठ्ठलाची महापूजा मुख्यमंत्र्याच्या हस्तेच; बंडखोरांनी काय झाडी, डोंगर, हाटील पाहावे'

अकोला : आषाढी एकादशीची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच करतील, बंडखोर आमदारांनी ११ जुलैपर्यंत गुवाहाटीतच राहावे असा टोला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी बंडखोर आमदारांना लगावला. आज सुप्रीम कोर्टात बंडखोर आमदारांच्या अपात्रेबाबत सुनावणी सुरु होती. या सुनावणी दरम्यान, सुप्रीम कोर्टाने आता पुढील सुनावणी ११ जुलै २०२२ ला होणार असल्याचं सांगितलं आहे.

त्यामुळे आता सत्ताधाऱ्यांसह बंडखोरांना निदान ११ जुलैपर्यंत कोणतीही कायदेशीर घडामोडी करणं शक्य नाही. शिवाय ११ जुलैपर्यंत बंडखोर आमदारांनाही अपात्रही ठरवता येणार नाही. ज्या आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावण्यात आलीय, त्यांना उत्तर देण्यासाठी ११ जुलैच्या संध्याकाळपर्यंत वेळ सुप्रीम कोर्टानं दिला आहे.

याच पार्श्वभूमीवर आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले, 'येत्या १० तारखेला आषाढी एकादशी आहे. या दिवशी विठ्ठलाची महापूजा हे मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच करतील तोपर्यंत बंडखोर आमदारांनी गुवाहाटीत काय झाडी, डोंगर आणि हाटील पाहावे असा टोलाही आमदार मिटकरी यांनी लगावला आहे.

राज्यातील राजकीय घडामोडी बघता महाविकास आघाडी सरकार टिकणार की नाही, असा संभ्रम सर्वांच्या मनात आहे. शिवाय यंदाच्या आषाढी एकादशीला हेच मुख्यमंत्री जाणार की नाहीत याबाबत देखील शंका उपस्थित केली जात असताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वर्षीची महापुजा करावी या प्रकारचे बॅनर देखील काही भाजप कार्यकर्त्यांनी लावले होते. या सर्व पार्श्वभूमीवर बोलताना मिटकरी यांनी बंडखोरांसह भाजपवरही निशाणा साधला.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply