अकोला : मनसे महाराष्ट्रव्यापी पक्ष नाही, मुंबईतील अस्तित्व किती हेही माहीत नाही: आंबेडकर

अकोला : मनसे हा महाराष्ट्रव्यापी पक्ष नाही, मुंबईमधील सर्व वॉर्डांमध्ये तरी त्यांच अस्तित्व आहे का नाही, हे पण माहिती नाही, असं वक्तव्य करत वंचित बहुजन पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे. ते आज अकोला येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपच्या भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ते म्हणाले, विरोधी पक्ष नेत्यांची बैठक राज्य सरकारने घेतली असून या बैठकीत फक्त भोंग्यावरच बोला असं म्हंटलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने भोंग्या संदर्भात परवानगी दिली आहे. तो आदेश केंद्र सरकारला व इतर राज्य सरकारला लागू आहे. असं असताना राज्य सरकारच्या विरोधी पक्षांच्या बैठकीत नवीन धोरण ठरविण्याबाबत राज्य सरकार केंद्र सरकारला सांगणार आहे. हा प्रकार वेगळाच असून या बाबतीत शंका निर्माण होत आहे. राज्य सरकार दबावाखाली असल्याची शक्यता असून राज्य सरकारमधील मंत्र्यांवरील ईडी व CBI चौकशी वाचविण्यासाठी राज्य सरकार ही खेळ करीत आहे का असा प्रश्नही आंबेडकरांनी उपस्थित केला.

तसंच भाजप आणि मनसेच्या भूमिके बाबत राज्य सरकारला शंका आहे. राज्यात काही तरी घडण्याची शक्यता असून ३ मे ला काही तरी घडणार असे वाटते. परंतु, राज्य सरकारने विरोधी पक्षाच्या बैठकीत काहीही बोलण्यास न दिल्याने आम्ही १ मे ला शांती मार्च राज्यात काढणार आहे. या मार्चमध्ये ज्या संघटना सहभागी होतील त्यांचे आम्ही स्वागत करणार आहोत. परंतु, इतर राजकीय पक्षांचे आम्ही स्वागत करणार नाही, असेही ते म्हणाले.

मनसे हा महाराष्ट्रव्यापी पक्ष नाही, मुंबईमधील सर्व वॉर्डांमध्ये तरी त्यांच अस्तित्व आहे का नाही, हे पण माहिती नाही. पण ज्या पद्धतीने सारखं इलेक्ट्रॉनिक मीडिया व प्रेस हा प्रश्न उचलते त्या पद्धतीने असे भासवले जाते की, राज्यभर यांची असणारी संघटना ही मजबूत आहे. मात्र, राज्यभर ही संघटना मोठी नाही. त्यांचे अस्तित्व काही भागामध्ये प्रभावशाली आहे, याबद्दल दुमत नाही. मात्र, मग एवढे बळ यांच्या पाठीमागे आले कोठून असा प्रश्न उपस्थित करीत कोणत्यातरी पक्षाचा त्यांना पाठिंबा आहे, असे वाटत असून त्याशिवाय ते मोठे होऊ शकत नाही, असा आरोप त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर केला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply