अंधेरी पोटनिवडणूक : एमसीए निवडणुकीत अंधेरीचं फिक्सिंग? नाना पटोलेंच्या वक्तव्यानंतर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया, म्हणाले “एमसीए निवडणुकीचा संदर्भ अंधेरी पोटनिवडणुकीशी लावणं हे निश्चितच उचित नाही."

राज्याती सध्या सर्वाधिक चर्चेत असलेली अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असं काल म्हटलं होतं. त्यानंतर आज सकाळपासूनच भाजपाच्या गोटात वेगवान हालचालीही सुरू झाल्या आणि अखेर या निवडणुकीतून भाजपाने माघार घेतली. तत्पूर्वी या सर्व घडामोडी सुरू असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी एक वेगळीचं शंका निदर्शनास आणून दिली होती. मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना अंधेरी पोटनिवडणुकीच्या घोडमोडीशी भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीचा संबंध जोडला जात आहे. पटोले यांनी तशी शंका उपस्थित केली आहे. यानंतर आता काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.

अशोक चव्हाण म्हणाले, “एमसीए निवडणुकीचा संदर्भ अंधेरी पोटनिवडणुकीशी लावणं हे निश्चितच उचित नाही. मला वाटतं की एखादी जागा एखाद्या आमदाराच्या निधनामुळे रिक्त झाली असेल, त्या जागेवर सहसा आपण विचार करतो की त्याच्या कुटुंबीयांना मदत केली पाहिजे. ही महाराष्ट्राची अनेक वर्षांची परंपरा राहिलेली आहे. जर अशा पद्धतीने विचार होत असेल तर काय वाईट आहे.”

तर “सध्या एक निवडणूक एमसीएची सुरू आहे, पैशांच्या खजिन्याची सुरू आहे. एमसीए म्हटलं तर पैशांचा खजिना. त्यामध्ये जे काही चित्र देशातील आणि राज्यातील लोकांनी पाहीलं आहे. एकीकडे कुठले विरोध होतात ते काही मला माहीत नाही. पण काल दोन्ही नेत्यांनी एकदम बिनविरोध निवडणूक व्हावी, असं जे म्हटलं. त्यामुळे एमसीएच्या राजकारणाचा वास यातून येतोय, असं निश्चितपणे वाटतं.” असं नाना पटोलेंनी म्हटलेलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply