१२ खासदारांसंह एकनाथ शिंदेंची संयुक्त पत्रकार परिषद; भावना गवळी, राहुल शेवाळेही उपस्थित

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षाला गळती लागली आहे. महाविकास आघाडीमधील ५० आमदार शिंदे गटात सामील झाल्यानंतर शिवसेनेचे १२ खासदार देखील शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज राजधानी दिल्लीत असून त्यांनी बंडखोर खासदारांसोबत बैठक घेतली आहे. यानंतर त्यांनी शिवसेनेचा स्वतंत्र गट म्हणून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र दिलं आहे.

संबंधित पत्रात राहुल शेवाळे हे गटनेते तर भावना गवळी यांचा उल्लेख मुख्य प्रतोद म्हणून करण्यात आला आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. तसेच १२ खासदारांनी घेतलेल्या भूमिकेचं त्यांनी स्वागत केलं आहे. या पत्रकार परिषदेत शिवसेना खासदार राहुल शेवाळे, भावना गवळी यांच्यासह १२ खासदार उपस्थित होते.

संबंधित १२ खासदारांनी लोकसभेत शिवसेनेचा एक वेगळा गट स्थापन करण्याबाबतचं पत्र लोकसभा अध्यक्षांना दिलं आहे. या पत्रात राहुल शेवाळे यांचा उल्लेख गटनेते म्हणून करण्यात आला आहे, तर शिवसेना खासदार भावना गवळी यांचा उल्लेख मुख्य प्रतोद म्हणून करण्यात आला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply