सीएसएमटी पुर्नविकासाचा मार्ग मोकळा; हेरिटेज संवर्धन समितीने दिली परवानगी

मुंबई : रेल्वेस्थानकांना विमानतळाप्रमाणे लूक देण्याचा रेल्वेचा मानस आहे. त्यानुसार रेल्वेच्या महत्त्वाच्या स्थानकांचा पुनर्विकास सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचाही पुनर्विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी हेरिटेज संवर्धन समितीने कामाला परवानगी दिली आहे. त्यामुळे सीएसएमटीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. सीएसएमटीचा पुनर्विकास करून जुने रूप देण्यात येणार आहे. सार्वजनिक आणि खासगी भागीदारी अर्थात पीपीपी मॉडेलऐवजी हायब्रीड बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर पद्धतीने रेल्वे निधी उभारून त्याचे काम करणार आहे. त्यामुळे एक हजार ६३७ कोटींच्या पुनर्विकास प्रकल्पासाठी आता एक हजार ३५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. ‘पीपीपी मॉडेलऐवजी हायब्रीड मॉडेलने सीएसएमटी पुनर्विकास प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. त्याला वित्त मंत्रालय, रेल्वे मंत्रालय, निती आयोग यांच्या मार्गदर्शन सूचना प्राप्त झाल्या आहेत. तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. पद्धतीनुसार एकूण खर्चाचा ४० टक्के निधी रेल्वेकडून उभारण्यात येईल. उर्वरित ६० टक्के निधी हा कर्जाऊ पद्धतीने घेण्यात येईल. तो परत देण्यासाठी २७ वर्षांचा करार करण्यात येईल. त्यानुसार संबंधित विकासकाला सीएसएमटी स्थानकात व्यावसायिक तत्त्वावर जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सीएसएमटी येथून मेट्रो ३, मेट्रो ११ आणि बस सेवेला थेट कनेक्टिव्हिटी देण्याची योजना आहे. रेल्वे स्थानकात ये-जा करण्यासाठी क्रॉफर्ड मार्केट येथून रस्ता तयार करण्यात येण्याचा प्रस्ताव आहे. पी. डिमेलो रोड दिशेने हार्बर मार्गाचे स्थलांतरण करण्यात येणार आहे. सध्याची विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) इमारत पाडून नवे विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय पी. डिमेलो मार्गावर उभारण्यात येणार आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply